आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Tour Of Sri Lanka, 1st Test: Sri Lanka V India At Galle, Aug 12 16, 2015

LIVE IND vs SL: पहिला दिवस अश्विन-शिखरचा,श्रीलंका बॅकफुटवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धवनने करिअरचे तिसरे अर्धशतक ठोकले. - Divya Marathi
धवनने करिअरचे तिसरे अर्धशतक ठोकले.
गाले - तीन मॅचच्या सीरीजमध्ये पहिल्याच टेस्ट सामन्यात श्रीलंकेच्या 183 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 2 विकेट्सच्या नुकसानावर 124 धावा केल्या आहेत. शिखर धवन (50) आणि कॅप्टन विराट कोहली (45) धावांवर नॉट आउट आहेत. धवनने करिअरचे तिसरे अर्धशतक ठोकले. तर कोहली आपल्या 11व्या अर्धशतकापासून केवळ पाच धावा दूर आहे. पहिला दिवर आर. अश्विनच्या नावे राहिला. त्याने 6 फलंदाज बाद करत कारकिर्दीतील सर्वोत्म प्रदर्शन केले.
लोकेश राहुलच्या रूपात टीम इंडियाला पहिला झटका बसला. त्याला प्रसादने अवघ्या 7 धावांवर असतानाच पायचित केले. त्याच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला मॅथ्यूजने 9 धावांवर बाद केले.
- अश्विनच्या फिरकीत अडकले श्रीलंकन खेळाडू, 183 धावातच परतले तंबूतः
पहिल्‍या कसोटी सामन्‍यात आर. अश्‍विनच्‍या दमदार गोलंदाजीने लंकेच्‍या फलंदाजांना तंबूत धाडले. त्‍याने 6 गडी बाद करत 46 धावा दिल्‍या. श्रीलंकन संघाची गाडी पहिल्यापासूनच रुळावरून घसरली होती. ती शेवटपर्यंत रूळावर योऊशकली नाही. अखेर पर्यंत त्यांना केवळ 183 धावाच करता आल्‍या.
श्रीलंकेचा कर्णधार अँज्लो मॅथ्यूज (64) आणि चांडीमल (59) यांची फलंदाजी सोडली, तर इतरांना टीम इंडियाने फार दिवे पेटवू दिले नाही. इशांत शर्मा आणि वरुण आरोन यांनीही एक एक गडी बाद केला.
भारत आणि यजमान श्रीलंका दरम्‍यान होणा-या कसोटी सामन्‍यांला आज (बुधवारी) सुरूवात झाली. पहिल्‍या सामन्‍यात नाणेफेक जिंकूण फलंदाजी करणा-या लंगेला टीम इंडियाचे गोलंदाज चांगलेच भारी पडले आहेत.
श्रीलंकेची खराब सुरूवात
सातव्‍या आणि आठव्‍या षटकातच श्रीलंकेचे दोन ओपनर खेळाडू बाद झाले. करुणरत्ने (9) याच्‍या रूपात पहिला झटका श्रीलंकन संघाला बसला. इशांत शर्माच्‍या षटकात त्याने रहाणेने कडे झेल दिला. पुढच्‍या वरूण आरोनच्‍या षटकातील पहिल्‍याच चेंडूने कौशल सिल्व्हाला (5) परतून लावले. धवनने त्‍याला झेलबाद केले. त्‍यानंतर कुमार संगकारा पाच धावांच्‍या वर खेळू शकला नाही. आर. अश्विनच्‍या षटकात लोकेश राहुलने त्‍याचा झेल घेतला. थिरिमने (13)ला आर. अश्विनने रहाणेच्‍या हातून झेलबाद केले.
दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, हरभजन सिंग, अमित मिश्रा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), इशांत शर्मा, वरुण आरोन, रविचंद्रन अश्विन.
श्रीलंका: अँज्लो मॅथ्यूज (कर्णधार), कौशल सिल्वा, डी. करूणारत्ने, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, दिनेश चांदिमल, जेहान मुबारक, रंगना हेराथ, धम्मिका प्रसाद, नुवान प्रदीप, पी.एच.टी कौशल.