कोलंबो - दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेने 3 विकेट गमावत 140 रन्स केले आहेत. अँजलो मॅथ्यूज आणि थिरिमने क्रीजवर आहे.
त्याआधी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी
टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात सर्वबाद 393 धावांची मजल मारली. आता श्रीलंकन खेळाडूंना झटपट बाद करुन त्यांच्यावर लीड मिळवणे हे भारतीय संघासमोर आव्हान असेल.
भारताचा पहिला डाव
दुसऱ्या दिवशी पहिला आणि टीम इंडियाला सातवा झटका आर. आश्विनच्या रुपाने बसला. त्याला मॅथ्यूजने सिल्वाच्या हातून झेलबाद केले.
साहाचे अर्धशतक
विकेटकीपर वृद्धिमान साहाने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि लंचनंतर 56 धावांवर बाद झाला. त्याने पहिल्या सामन्यात 60 धावांची खेळी केली होती. साहाचे हे कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. तो बाद झाल्यानंतर इशांत शर्मा (2) देखील तंबूत परतला. उमेश यादव (2) नाबाद राहिला.
पहिल्या दिवसाचा खेळ रोमांचक
पहिल्या दिवशी टीम इंडियाने श्रीलंकेच्या विरोधात दिवसअखेर 6 बाद 319 रन्स केले. रोहित शर्मा 79 धावांवर दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. तर वृद्धिमान साहा नाबाद राहिला. त्याआधी युवा सलामीवीर लोकेश राहुल (108), कर्णधार विराट कोहली (78) आणि रोहित शर्मा (79) यांच्या संयमी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 300 चा टप्पा पार केला.