आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Tour Of Zimbabwe, 1st T20I: Zimbabwe V India At Harare, Jul 17, 2015

IND vs ZIM: टीम इंडियाकडून झिम्‍बाब्‍वेचा 54 धावांनी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फटकेबाजी करताना अजिंक्य रहाणे. - Divya Marathi
फटकेबाजी करताना अजिंक्य रहाणे.
हरारे - पहिल्‍या T-20 मध्‍ये भारताने 54 धावांनी झिम्‍बाब्‍वेचा पराभव केला आहे. अक्षर पटेलने आपल्‍या शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन घडवत झिम्‍बाब्‍वेचे तीन गडी बाद केले आहेत. त्‍यानंतर हरभजनने दोन तर, मोहित शर्माने एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजापुढे झिम्‍बाब्‍वेचे पहिल्‍या फळीतील फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. त्‍यामुळे 179 धावांचा डोंगर झिम्‍बाब्‍वेला पेलवला नाही.
त्‍याआधी नाणेफेक जिंकून टीम इंडिया झिम्‍बाब्‍वेविरूद्ध फलंदाजी करण्‍यासाठी मैदानात उतरली. भारताने 179 धावांचे आव्‍हान झिम्‍बाब्‍वेसमोर ठेवले आहे. दरम्यान, नुकतीच झालेली वनडे सिरीज भारताने 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू चांगल्याच फर्मात ‍होते. तोच उत्‍साह या सामन्‍यातही कायम राहला व T-20 चा पहिला सामना भारताने आपल्‍या पदरात पाडून घेतला. रॉबिन उथप्‍पा 39 धावा काढून नॉट आऊट राहिला, तर विजयने 34 आणि रहाणेने 33 धावा संघासाठी वेचल्‍या. त्‍यातुलनेत झिम्‍बाब्‍वेची अर्धशतकापर्यंतची सुरूवात जोरदार होती. मात्र, त्‍यानंतर पहिल्‍या फळीतील फलंदाजही जास्‍त काळ मैदानावर टिकू शकले नाहीत.
झिम्‍बाब्‍वेच्‍या धावा
हॅमिल्टन मसकदजा -28
चिभाभा - 23
चार्ल्स कोवेंट्री - 10
सिकंदर रजा - 10
क्रेमर- 09
क्रेग इरविन- 02
एल्टन चिगुंबुरा - 1
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सामन्‍यातील फाेटो..