आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India V SA: South Africa Tour Of India, 3rd Test 3rd Day: At Nagpur, Nov 25 29, 2015,

भारताचा विजय, दक्षिण आफ्रिकेने तब्बल नऊ वर्षांनी गमावली विदेशात मालिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर जल्लोश करताना भारतीय खेळाडू. - Divya Marathi
विजयानंतर जल्लोश करताना भारतीय खेळाडू.
नागपूर- आर. अश्विन व अमित मिश्राच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर येथील जामठा मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत 124 धावांनी शुक्रवारी पराभव केला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 310 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या आफ्रिकन संघाला 185 धावांवरच रोखले. या विजयासोबत भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घातली. या बरोबरच आफ्रिकन संघावर तब्बल 9 वर्षांनंतर परदेशात कसोटी मालिकेत पराभूत होण्याची नामुष्की आली.
या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला होतो. हा सामना भारतने जिंकला. तर दुसरा सामना बेंगळुरु येथे पावसामुळे अनिर्णित राहीला होता. आता या मालिकेचा चौथा आणि अंतीम सामना दिल्ली येथील फिरोज शाह कोटला मैदानावर खेळवला जाणार आहे.
अश्विन सामनावीर
झालेल्या या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 7 बळी घेतले. त्याच्या या कामगिरी मुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आेले.
थोडक्यात धावफलक
भारताचा पहिला डाव: 215 धावा.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव: 79 धावा.
भारताचा पहिला डाव: 173 धावा.
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव: 185 धावा.
नागपूरचे मैदान हे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरले. या मैदानावर दोन दिवसांत तब्बल 40 फलंदाज बाद झाले. पहिल्या दिवशी 12 (10 भारत आणि 2 आफ्रिकेचे), दुसऱ्या दिवशी तब्बल 20 फलंदाज (8 द. आफ्रिका (पहिला डाव), 10 भारत (दुसरा डाव), 2 आफ्रिका (दुसरा डाव) तर तिसऱ्या दिवशी आफ्रिकन संघाचे 8 फलंदाज (दुसरा डाव) बाद झाले.
फॅक्ट
-नागपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एकूण 20 फलंदाज बाद झाले.
-एका दिवसात सर्वाधिक फलंदाज बाद होण्याचा विक्रम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात नोंदवला गेला होता.
-1888 मध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात तब्बल 27 फलंदाज बाद झाले होते. केवळ दोन दिवसात संपलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने 61 धावांनी जिंकला होता.
भारताचा दुसरा डाव
भारताने आपल्या दुसऱ्या डावात सर्व बाद 173 धावा केल्या. पहिल्या डावात मिळालेल्या 136 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने आफ्रिकेसमोर 310 धावांचे लक्ष ठेवले.
भारताने पहिल्या डावात 215 धावा केल्या होत्या. उत्तरात आफ्रिकेला केवळ 79 धावाच करता आल्या. भारतविरूद्ध खेळताना ही आफ्रिकेची सर्वात खराब कामगिरी होती.या आधी म्हणजेच 2006 मध्ये भारताने जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकन संघाला 84 धावांतच गुंढाळले होते.
भारताचा धाव फलक
फलंदाजधावाचेंडू46
मुरली विजयझे. अमला गो. मोर्कल51510
शिखर धवनझे. विलास गो. इमरान397860
चेतेश्वर पुजाराबो. डुमिनी314550
विराट कोहलीझे. प्लेसिस गो. इमरान ताहिर163020
रहाणेझे. डुमिनी गो. इमरान91310
रोहित शर्माझे. एल्गर गो. मोर्कल233911
रिद्धिमान साहाझे. अमला गो. इमरान ताहिर71310
रवींद्र जडेजाबोल्ड हार्मर5610
आर. अश्विनपायचित मोर्कल72210
अमित मिश्रात्रिफळाचित इमरान ताहिर141820
इशांत शर्माnot out1300
दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव
फलंदाजधावाचेंडू46
डीन एल्गरझे. पुजारा गो. अश्विन185811
वान जिलझे. रोहित शर्मा गो. अश्विन52900
इमरान ताहिरपायचित गो. अमित मिश्रा8720
हाशिम अमलाझे. कोहली गो. अमित मिश्रा3916720
एबी डिव्हिलियर्सपायचित गो. अश्विन92110
प्लेसिसगो. अमित मिश्रा3915231
डुमिनीपायचित गो. अश्विन194420
विलासझे. साहा गो. अश्विन121610
हार्मरnot out52200
रबाडाझे. विराट गो. अश्विन61710
मोर्ने मोर्कलnot out0500
भारताचा पहिला डाव-
नागपुरच्या जामठा मैदानावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टेस्टमध्ये मोर्ने मोर्कल (35 धावा देत 3 फलंदाज बाद केले) आणि हार्मर (78 धावा देत 4 फलंदाज बाद केले) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर द. आफ्रिकेने भारताला पहिल्या डावात 215 धावांवर रोखले होते. भारताकडून मुरली विजयने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर साहाने 32 आणि रविंद्र जडेजाने 34 धावा केल्या होत्या.
भारताचा धाव फलक
फलंदाजधावाचेंडू46
मुरली विजयपायचित गो. मोर्कल408431
शिखर धवनझे. & गो. डीन एल्गर122320
चेतेश्वर पुजारापायचित गो. हार्मर214320
विराट कोहलीझे. विलास गो. मोर्कल225520
अजिंक्य रहाणेगो. मोर्कल132501
रोहित शर्माझे. डिव्हिलियर्स गो. हार्मर22800
रिद्धिमान साहाझे. डुमिनी गो. हार्मर3210640
रवींद्र जडेजागो. रबाडा345460
आर. अश्विनगो. ताहिर154410
अमित मिश्रापायचित गो. हार्मर3900
इशांत शर्माnot out0000
द. आफ्र‍िकेचा पहिला डाव...
भारताने पहिल्या डावात 215 धावा केल्या होत्या. उत्तरात आफ्रिकेला केवळ 79 धावाच करता आल्या. भारतविरूद्ध खेळताना ही आफ्रिकेची सर्वात खराब कामगिरी होती.या आधी म्हणजेच 2006 मध्ये भारताने जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकन संघाला 84 धावांतच गुंढाळले होते.
आफ्रिकेचा धाव फलक
फलंदाजधावाचेंडू46
डीन एल्गरगो. अश्विन73510
वान जिलझे. रहाणे गो. अश्विन0700
इमरान ताहिरगो. जडेजा41210
अमलाझे. रहाणे गो. अश्विन11000
एबी डिव्हिलियर्सझे. & गो. जडेजा0600
प्लेसिसगो. जडेजा102010
डुमिनीLBW गो. अमित मिश्रा356512
विलासगो. जडेजा11500
सिमोन हार्मरगो. अश्विन131020
रबाडाnot out61710
मोर्कलझे. & गो. अश्विन1200
पुढील स्लाइड्सवर पाह, सामन्याचा रोमांच...