हरारे- प्लेअर ऑफ द मॅच युवा लेगस्पिनर यजुवेंद्र चहलच्या (२५ धावांत ३ विकेट) दमदार प्रदर्शनानंतर फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर भारताने दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेला ८ विकेटने हरवले. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांत आता तिसरा वनडे सामना १५ जून रोजी खेळवला जाईल.
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने
आपल्या युवा ब्रिगेडच्या बळावर २० महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या नेतृत्वात वनडे मालिका जिंकली आहे. धोनीने याआधी आपल्या नेतृत्वात ऑक्टोबर २०१४ मध्ये भारतात वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. भारताच्या युवा गोलंदाजांनी एक वेळ ३ बाद १०६ धावा अशा चांगल्या स्थितीत असलेल्या झिम्बाब्वेला ३४.३ षटकांत १२६ धावांत गुंडाळले. यानंतर भारताने २६.५ षटकांत १२९ धावा काढून विजय मिळवला. भारताने पहिला वनडे ९ विकेटने जिंकला होता.
भारतीय युवांची चांगली फलंदाजी
भारताकडून के. राहुल (३३) आणि करुण नायर (३९) यांनी पहिल्या विकेटसाठी १४.४ षटकांत ५८ धावांची सलामी दिली. राहुल बाद झाल्यानंतर नायर आणि अंबाती रायडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२ षटकांत ६७ धावा काढून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. भारताच्या १२५ धावा झाल्या असताना सिकंदर राजाने नायरला पायचीत केले. नायरने ६८ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या साहाय्याने ३९ धावा काढल्या. रायडूने यानंतर मनीष पांडेसोबत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजाच्या याच षटकात मनीष पांडेने चौकार खेचून विजय मिळवला. रायडूने नाबाद ४१ धावांचे योगदान दिले. त्याने ४४ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ही खेळी केली. मनीष पांडे ४ धावांवर नाबाद राहिला.
सिबांदाचे अर्धशतक : झिम्बाब्वेकडून सिबांदाने अर्धशतक ठोकत सर्वाधिक ५३ धावा काढल्या. याशिवाय चिभाभाने २१, सिकंदर राजाने १६ धावा काढल्या.
लेगस्पिनर यजुवेंद्र चहलच्या ३ विकेट
युवा लेगस्पिनर यजुवंेद्र चहल (३ विकेट) आणि वेगवान गोलंदाज बरिंदर सरण व धवल कुलकर्णी यांच्या प्रत्येकी २ विकेटच्या बळावर भारताने झिम्बाब्वेला ३४.३ षटकांत १२६ धावांत ढेर केले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनीसुद्धा प्रत्येकी १ विकेट घेतली. चहलने व्ही. सिबांदा, सिकंदर राजा आणि चिगुम्बुरा यांना बाद केले.
धोनीची रणतुंगाशी बरोबरी
महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून हा १९३ वा सामना होता. यासह त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू अर्जुन रणतुंगाची बरोबरी केली. धोनीच्या नेतृत्वात भारताचा हा १०६ वा विजय ठरला आहे. वनडेत सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (२१८ वनडे) , पाँटिंग (२३० सामने) आहे.
अामच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी करून झिम्बाब्वेला २०० च्या आत रोखले. आमच्या फिरकीपटूंनी योग्य वेळी विकेट घेतल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय मिळवणे असते. आमची फलंदाजीसुद्धा चांगली झाली.
- महंेंद्रसिंग धोनी, विजयानंतर.
टीम इंडियाचा धावफलक
बॅट्समॅन |
रन |
बॉल |
4 |
6 |
लोकेश राहुल |
बो. चिभाभा |
33 |
50 |
4 |
0 |
करूण नायर |
LBW सिकंदर रजा |
39 |
68 |
5 |
0 |
अंबाती रायुडू |
नॉट आउट |
41 |
44 |
7 |
0 |
मनीष पांडे |
नॉट आउट |
4 |
1 |
1 |
0 |
झिम्बाब्वेचे स्कोरबोर्डः
बॅट्समॅन |
रन |
बॉल |
4 |
6 |
हॅमिल्टन मास्कदजा |
कॅ. बुमराह बो. सरन |
9 |
14 |
1 |
0 |
चिबाबा |
lbw बो. कुलकर्णी |
21 |
26 |
1 |
0 |
पीटर मूर |
lbw बो. सरन |
1 |
9 |
0 |
0 |
सिबांदा |
कॅ. जाधव बो. चहल |
53 |
69 |
6 |
1 |
सिकंदर रजा |
कै. जाधव बो. चहल |
16 |
41 |
1 |
0 |
चिगुंबुरा |
lbw बो. चहल |
0 |
1 |
0 |
0 |
मुतुंबामी |
कॅ. धोनी बो. बुमराह |
2 |
14 |
0 |
0 |
क्रीमर |
नॉट आउट |
7 |
15 |
0 |
0 |
चतारा |
बो. कुलकर्णी |
2 |
6 |
0 |
0 |
मुजरबानी |
LBW बो. अक्षर पटेल |
5 |
10 |
1 |
0 |
सीन विलियम्सन |
अब्सेंस हर्ट |
- |
- |
- |
- |
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, सामन्याचे फोटो..