आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INDvsAUS: ऑस्ट्रेलियाचा सात धावांनी विजय, भारताचा पून्हा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्ज बेलीने नॉट आऊट 76 धावा केल्या. - Divya Marathi
जॉर्ज बेलीने नॉट आऊट 76 धावा केल्या.
ब्रिस्बेन- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 गडिराखून विजय मिळवला. 309 धावांचे लक्ष्य त्यांनी 49 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.तत्तपूर्वी नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताने रोहित शर्माची शानदार शतकी खेळी आणि विराट-रहाणेची दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 8 गड्यांच्या मोबदल्यात 308 धावा केल्या होत्या. गाबाच्या मैदानावर ही भारताची सर्वाधिक धावसंख्या होती. ब्रिस्बेनमधील विजयाबरोबरच ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाला फिंचच्या (71) रुपात पहिला धक्का बसला. त्याला जडेजाने रहाणे करवी झेलबाद करुन तंबूचा रस्ता दाखवला. थोड्याच वेळात शॉन मार्शदेखील 71 धावा करुन बाद झाला. त्याला इशांत शर्माने विराट करवी झेलबाद केले.
असा राहिला भारताचा डाव
पहिले फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 309 धावांचे लक्ष ठेवले. रोहित शर्माच्या (124) शानदार शतक तर विराट (59) आणि अजिंक्यच्या (89) अर्धशतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 8 विकेटच्या मोबदल्यात 308 धावा केल्या. गाबाच्या मैदानावर ही भारताची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.
रोहितचे शतक पुन्हा एकदा 'कुचकामी'...
- रोहित शर्माने 111 चेंडूत कारकिर्दीतील 10 वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 5 वे शतक ठोकले.
- पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसिय सामन्यात त्याने नॉट आउट 171 धावा केल्या होत्या.
- त्याने 127 चेंडूत 124 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तो तिसऱ्या गड्याच्या रुपात धाव बाद झाला.
- रोहितनंतर अजिंक्य रहाणेनेही कारकिर्दितील 14 वे अर्धशतक ठोकले. त्याने 89 धावा केल्या तो फॉल्कनच्या चेंडूवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा डाव...
- जडेजाने ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी घेतला. त्याने अॅरॉन फिंचला रहाणे करवी झेलबाद केले.
- फिंचने 81 चेंडूत 71धावा केल्या. त्यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
- ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का मिळाला तो शॉन मार्शच्या रुपात त्याला इशांत शर्माने विराट करवी झेलबाद केले.
- मार्शने 84 चेंडूत 5 चोकारांच्या सहाय्याने 71 धावा केल्या
- उमेशने ऑस्ट्रेलियाचा तिसरा बळी घेतला. त्याने स्मिथचा 46 धावांवर असताना त्रिफळा उडवला.