Home »Sports »From The Field» Live India Vs Australia, 2nd ODI Cricket Match Updates

कुलदीप- भुवीच्या गाेलंदाजीने भारताच्या विजयाचा ‘दीप’; मालिकेत 2-0 ने अाघाडी

वृत्तसंस्था | Sep 22, 2017, 13:30 PM IST

  • हॅट्ट्रिक घेतल्यानंतर कुलदीप यादवचे अभिनंदन करताना टीम इंडियाचे खेळाडू...
काेलकाता-कुलदीप यादव (३/५४) अाणि भुवनेश्वर कुमारने (३/९) धारदार गाेलंदाजीच्या बळावर काेलकात्यात घटस्थापनेला टीम इंडियाच्या विजयाचा दीप लावला. भारताने गुरुवारी दुसऱ्या वनडेत अाॅस्ट्रेलियाचा अवघ्या २०२ धावांमध्ये धुव्वा उडवला. भारताने ४३.१ षटकांत ५० धावांनी सामना जिंकला. या विजयाच्या बळावर भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने अाघाडी घेतली. मालिकेतील तिसरा व अाॅस्ट्रेलियासाठीचा निर्णायक वनडे रविवारी इंदूर येथील हाेळकर स्टेडियमवर हाेईल.

सामनावीर विराट काेहली (९२) अाणि अजिंक्य रहाणेच्या (५५) शतकी भागीदारीच्या बळावर यजमान टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियासमाेर विजयासाठी २५३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने २०२ धावांत गाशा गुंडाळला. स्मिथ (५९) अाणि स्टाेईनिसचे (नाबाद ६२) अर्धशतक व्यर्थ ठरले.

काेहली- रहाणेची शतकी भागीदारी-
काेहली व रहाणेने संघाचा डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर काेहलीने केदारसाेबत ५५ धावांची भागीदारी केली.

काेहलीचे शतक हुकले-
विराट काेहलीने दमदार पुनरागमन करताना अर्धशतकी खेेळी केली. त्याचे ८ धावांनी शतक हुकले. त्याने १०७ चेंडूंत ८ चाैकारांसह ९२ धावांची खेळी केली. त्याला नॅथन नाइलने बाद केले.
धाेनीचे त्रिशतक-

माजी कर्णधार धाेनीने ईडन गार्डनवर वनडेचे त्रिशतक ठाेकले. त्याचा करिअरमधील हा ३०० वा वनडे सामना हाेता. मात्र, त्याला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्याने ५ धावांचे याेगदान देत पॅव्हेलियन गाठले. वनडे करिअरमध्ये वनडेचे त्रिशतक ठाेकणारा धाेनी हा भारताचा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, सचिन (४६३), द्रविड (३४४), अझरुद्दीन (३३४), गांगुली (३११), युवराज(३०४) यांनीही वनडेचा तिहेरी अाकडा पार केला अाहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोलकात्या सामन्यातील क्षणचित्रे....

Next Article

Recommended