आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India VS SA, 3rd Test: India V South Africa At Nagpur, Nov 25 29, 2015

IND vs SA: भारत सर्व बाद 215, आफ्रिकेला दुसरा झटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरली विजय एक सुंदर शॉट मारताना - Divya Marathi
मुरली विजय एक सुंदर शॉट मारताना
नागपूर- येथील जामठा स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने पहिल्या डावात दिलेल्या 215 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची भंभेरी उडाली. आफ्रिकेने 2 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा केल्या असून. डीन एल्गर आणि हाशिम अमला क्रीजवर आहेत.
द. आफ्रिकेला जिलच्या रुपात पहिला झटका बसला. त्याला आर. अश्विनने रहाणे करवी झेलबाद केले. जिलने 7 बॉलचा सामना केला मात्र तो भोपळाही फोडू शकला नाही. या नंतर लगेचच नाइट वाचमनच्या रूपात आलेला इमरान ताहिरही 4 धावा करून बाद झाला. त्याला जडेजाने बोल्ड केले.
भारत सर्व बाद- 215
नागपुरच्या जामठा स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टेस्टमध्ये मोर्ने मोर्कल (35 धावा देत 3 विकेट) आणि हार्मर (78 धावा देत 4 विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर द. आफ्रिकेने भारताला पहिल्या डावात 215 धावांवर ऑलआउट केलेले. भारताकडून मुरली विजयने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर साहाने 32 आणि रवींद्र जडेजाने 34 धावा केल्या.
धवनने केल्या 12 धावा
भारताला लंचपर्यंत शिखर धवन आणि मुरवी विजयच्या रुपात दोन झटके बसले. धवन 12 धावा करून भारताच्या 50 धावा असताना आउट झाला. त्याला डीन एल्गरने आउट केले. या नंतर विजय आणि पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी 19 धावा केल्या. विजयला मोर्ने मोर्कलने LBW केले. त्याने 40 धावा केल्या.
कोहलीने केल्या 22 धावा
भारतीय सघ सावरण्या आधीच हार्मरने चेतेश्वर पुजारा (21) LBW करून भारताला तिसरा झटका दिली. या नंतर अजिंक्य रहाणे (13) आणि कर्णधार विराट कोहली (22) झटपट बाद झाले. विराटला मोर्कलने विलासच्या हाते झेलबाद केले. तर रहाणेला बोल्ड केले.
भारताचा धाव फलक
बॅट्समनधावाचेंडू46
मुरली विजयLBW बो. मोर्कल408431
शिखर धवनकॅ. & बॉ. डीन एल्गर122320
चेतेश्वर पुजाराLBW बॉ. हार्मर214320
विराट कोहलीकॅ. विलास बॉ. मोर्कल225520
अजिंक्य रहाणेबॉ. मोर्कल132501
रोहित शर्माकॅ. डिविलियर्स बॉ. हार्मर22800
रिद्धिमान साहाकॅ. डुमिनी बॉ. हार्मर3210640
रवींद्र जडेजाबॉ. रबाडा345460
आर. अश्विनबॉ. ताहिर154410
अमित मिश्राLBW बॉ. हार्मर3900
इशांत शर्माnot out0000
तत्पूर्वी भारताने आफ्रिकेविरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 1-0 ने पिछाडीवर असलेला आफ्रिकन संघ मालिकेत परतण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. मात्र या मैदानावर फिरकीला मिळणारी मदत, अमला- डु प्लेसिस यांचा खराब फॉर्म, फिलांडर आणि स्टेन यांना झालेली दुखापत यासारख्या समस्यांमुळे आफ्रिकन संघ अडचणीत आहे. आफ्रिकेने हा सामना गमावला तर 9 वर्षांनंतर परदेशात मालिकेत पराभव होण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा रोमांच...