आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-SL टेस्टः विराटने सलग तिस-या टेस्‍टमध्ये ठोकले शतक, भारत 265 पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍ली- श्रीलंकाविरुद्धच्‍या तिस-या आणि शेवटच्‍या कसोटी सामन्‍यात भारताने पहिल्‍या दिवशी  2 विकेट्स गमावून 269 धावा केल्‍या आहेत. मुरली विजय (107) आणि विराट कोहली (101) बॅटींग करत आहेत. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या फिराेजशहा काेटला मैदानावर होत असलेल्‍या या मॅचमध्‍ये भारताच्‍या प्‍लेइंग इलेव्‍हनमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. उमेश यादवच्‍या जागेवर मोहम्‍मद शमी आणि लोकेश राहुलच्‍या जागी शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले अाहे.     

 

अशा पडल्‍या भारताच्‍या विकेट्स 
- भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 42 धावांच्‍या स्‍कोअरवर भारताला पहिला झटका बसला. 
- 9.6 ओव्‍हरमध्‍ये शिखर धवन (23) दिलरुवान परेराच्‍या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सुरंगा लकमलने त्‍याचा झेल झेलला. 
- भारताला दुसरा झटका 20.0 ओव्‍हरमध्‍ये बसला. 78 धावांचा स्‍कोअर झालेला असताना चेतेश्‍वर पुजारा (23) आऊट झाला. 
- लाहिरु गमागेच्‍या गोलंदाजीवर सदीरा समरविक्रमाने त्‍याचा झेल झेलला. 

 

मालिका 2-0ने खिशात घालण्‍याची संधी 

या कसाेटीतील विजयासह भारताला ही मालिका २-० ने अापल्या नावे करण्याची संधी अाहे. याशिवाय सलग नऊ कसाेटी मालिका विजयाच्या विक्रमाची बराेबरीही भारताला साधता येईल. तसेच यजमानांना अापल्या घरच्या मैदानावर पुन्हा एका विक्रमाची अापल्या नावे नाेंद करता येईल. 


श्रीलंकेला अापल्या घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा पराभूत करणारा संघ हाेण्याची कामगिरी भारताच्या नावे नाेंदवली जाईल. भारताने अातापर्यंत अापल्या मैदानावर श्रीलंकेला ११ वेळा पराभूत केेले अाहे. दुसरीकडे हीच कामगिरी अाॅस्ट्रेलिया अाणि दक्षिण अाफ्रिकन टीमच्याही नावे अाहे. या दाेन्ही संघांनी अापल्या घरच्या मैदानावर अातापर्यंत प्रत्येकी ११ वेळा श्रीलंकेला पराभूत केले अाहे. त्यामुळे हे तिन्ही संघ या विजयाच्या कामगिरीमध्ये साेबत अाहेत.

 

मात्र, यामध्ये अाघाडी घेण्याची भारताकडे माेठी संधी अाहे. यातून तिसऱ्या कसाेटीतील श्रीलंकेच्या पराभवाने भारताच्या नावे १२ व्या विजयाची नाेंद हाेईल. यातून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजयाच्या कामगिरीमध्ये अाॅस्ट्रेलिया अाफ्रिकेला मागे टाकू शकेल. 

 

३० वर्षांपासून काेटलावर विजयश्री  

दिल्लीच्या फिराेज शहा काेटला मैदानावर यजमान भारताचे पारडे काहीसे जड मानले जाते. या मैदानावर अातापर्यंतच्या ३० वर्षांत एकही कसाेटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे हीच विजयी माेहीम अशीच कायम ठेवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल. श्रीलंकेने अापला शेवटचा सामना या मैदानावर २००५ मध्ये खेळला हाेता. या वेळीही श्रीलंकेचा पराभव झाला हाेता. 


काेहली विक्रमाच्या उंबरठ्यावर 
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीला यंदाचे सत्र हे सर्वाेत्कृष्ट करण्याची माेठी संधी अाहे. यातून ताे अापल्या नावे नवा विक्रमही नाेंदवू शकताे. यासाठी त्याला ७१ धावांची गरज अाहे. यातून ताे सत्रात क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावा नाेंदवू शकताे. अाता त्याच्या नावे २५२५ धावांची नाेंद अाहे. यात ७१ धावांची भर घातल्यास ताे गत सत्रातील कामगिरी मागे टाकू शकेल. त्याने गत २०१६ च्या सत्रात २५९५ धावा काढल्या हाेत्या. 

 

प्लेइंग इलेव्‍हनः
भारत- शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (c), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा (wk), रविंद्र जडेजा, मो. शमी आणि इशांत शर्मा.
श्रीलंका- सदीरा समरविक्रमा, दिमुथ करुणारत्ने, धनंजय डिसिल्वा, अँजेलो मैथ्यूज, दिनेश चांडीमल (c), निरोशन डिकवेला (wk), रोशन सिल्वा, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, लक्षण संदाकन आणि लाहिरू गमागे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...


 

बातम्या आणखी आहेत...