आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा 622 धावांचा डोंगर; श्रीलंकेची 2 बाद 50 अशी नाजूक स्थिती, अश्विनने रचला इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे - सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत काेलंबाेच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर ९ बाद ६२२ धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यासह भारताने विक्रमी धावांचा डाेंगर रचला. अश्विनने १४० वर्षांच्या कसाेटी क्रिकेटमध्ये एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. फिरकीच्या जाळ्यात अडकल्याने यजमान श्रीलंकेची खडतर लक्ष्यच्या प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात केली. श्रीलंकेने दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ५० धावा काढल्या. अाता मेंडिस (१६) अाणि कर्णधार दिनेश चांदिमल (८) मैदानावर खेळत अाहेत. भारताने सलग दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ६०० पेक्षा अधिक धावा काढल्या.  
 
भारतीय संघाने ३ बाद ३४४ धावांवर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. अजिंक्य रहाणेने १३२ धावांची खेळी केली. अश्विन (५४), वृद्धिमान साहा (६७) व रवींद्र जडेजाने (५०) नाबाद अर्धशतके ठाेकून टीम इंडियाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला.   
 
वर्षभरात नवव्यांदा  ५०० पेक्षा अधिक धावा : भारताने वर्षभरात कसाेटीत सलग नवव्यांदा ५०० पेक्षा अधिक धावांचा डाेंगर रचला. गत जुलै २०१६ मध्ये झालेल्या विंडीजविरुद्ध कसाेटी मालिकेपासून अातापर्यंत ९ वेळा ५०० अधिक धावसंख्या केली. तसेच काेहलीच्या नेतृत्वात टीम सध्या कसाेटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अाहे. 
 
अश्विनचा विक्रम 
भारताचा फिरकीपटू अार.अश्विनने १४० वर्षांच्या कसाेटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याने सर्वात वेगवान २००० धावा अाणि २५० पेक्षा अधिक विकेट  घेण्याच्या कामगिरीचा डबल धमाका उडवणारा पहिला अाॅलराउंडर झाला. यामध्ये त्याने न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडलीचा विक्रम माेडीत काढला. हेडलीने ५४ कसाेटीत हा विक्रम नाेंदवला हाेता. मात्र, अाता अश्विनने ५१ व्या कसाेटीत हा पल्ला गाठला. यात ताे अव्वल स्थानावर अाहे. यात इंग्लंडचा इयान बाेथम व पाकचा इम्रान प्रत्येकी ५५ कसाेटीसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी अाहेत. अश्विनने पहिल्या डावात ५४ धावांची खेळी करताना गाेलंदाजीत २ विकेट घेतल्या. यातून त्याला विक्रमाला गवसणी घालता अाली.   
 
 
भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर 
कसाेटी सामन्यात सर्वाधिक ५०० वा त्यापेक्षा अधिक धावा काढण्यात भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर अाहे. अातापर्यंत भारताने ८० वेळा कसाेटीत ५०० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. कसाेटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५०० पेक्षा अधिक धावा काढण्यात अाॅस्ट्रेलिया अव्वल स्थानी अाहे. त्यापाठाेपाठ इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर अाहे.  
 
अाॅस्ट्रेलिया : १४१ वेळा ५००+
इंग्लंड : १०५ वेळा ५००+
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, धावफलक आणि दुस-या दिवसातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...