आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 2016 Opening Ceremony: Spotlight On Katrina Kaif, Ranveer Singh, Chris Brown

डान्स फ्लोअरवर बॅट-पॅडसह रणवीर, कॅटरिना-जॅकलीनचा दिलखेचक परफॉर्मन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरीनाने सर्वप्रथम धूम चित्रपटातील गाण्यावर परफॉर्मन्स दिला. - Divya Marathi
कतरीनाने सर्वप्रथम धूम चित्रपटातील गाण्यावर परफॉर्मन्स दिला.
मुंबई - वर्ल्ड चॅम्पियन विंडीज टीमचा अाॅलराउंडर डॅवेन ब्राव्हाेने नवव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेचे बिगुल वाजवले. या वेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने अायपीएलचा उद््घाटन साेहळा रंगला. या कार्यक्रमात श्रीलंकेची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससह कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, हनी सिंग यांच्या नृत्याविष्काराने साेहळ्याला रंगत अाणली. ‘चलाे, चलाे’ या गाण्यावर ब्राव्हाेसह कॅटरिना, रणवीर अाणि जॅकलीन थिरकले. तसेच नयनरम्य लेझर शाेने उपस्थितांचे डाेळे दिपून गेले. अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद््घाटन साेहळा झाला. या साेहळ्याला माेठ्या संख्येत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास साेहळ्याला सुरुवात झाली.
"बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील पेहरावासह रणवीर सिंगने व्यासपीठावर शानदार एंट्री केली. त्यामुळे चाहत्यांनी माेठ्या संख्येत टाळ्यांचा कडकडाट केला.

कोणी कोणत्या गाण्यावर केले परफॉर्म
- आयपीएलच्या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात जॅकलीन फर्नांडिसच्या दिलखेचक डान्सने झाली.
- जॅकलीनने 'किक'मधील 'मुझे यार ना मिले तो मर जावां..', रेस-2 मधील 'पार्टी ऑन माय माइंड' आणि 'हो जरा मतलबी' या रॉयमधील गाण्यांवर परफॉर्म केले.
- डान्स ग्रुप किंग्स यूनायटेडच्या परफॉर्मन्सनंतर सर्व 8 संघांच्या कर्णधारांना खिलाडू वृत्तीची शिपथ देण्यात आली.
- ब्राव्होचा चॅम्पियन डान्स, योयो हनीसिंगचे दम-दम-दम आणि रणवीरसिंहने 'तुने मारी एंट्रीयां...' या गाण्यावर सर्वांना थिरकायला लाविल असा परफॉर्म दिला.
- रणवीरने गोलियो की रासलीला, गुंडे या चित्रपटातील गाण्यांवर सादरीकरण केले.
- त्याने डान्स फ्लोअरवर पॅड आणि बॅटसह डान्स केला. त्यासोबतच त्याच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील गाण्यावर तलवारबाजीही केली.

कोणत्या टीमचा कर्णधार पोहोचला स्टेजवर सर्वात आधी
- सर्वात पहिले दिल्ली डेअर डेव्हिल्सचा कर्णधार जहीर खान याला स्टेजवर पाचारण करण्यात आले.
- त्यानंतर गुजरात लायन्सचा सुरेश रैना, किंग्ज इलेव्हन पंजाबचा डेव्हिड मिलर, कोलकाता नाइट रायडर्सचा गौतम गंभीर, पुणे सुपरजायंट्सचा एम.एस. धोनी, बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा विराट कोहली, सनरायझर्स हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा स्टेजवर पोहोचला.

कोण कोण उपस्थित होते
आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकूर, बॉलिवूड स्टार संजय दत्त पत्नी मान्यतासह उपस्थित होता. किंग्ज इलेव्हन पंजाबची सह-मालक प्रीती झिंटा ओपनिंग सेरेमनीला उपस्थित होती.
आयपीएलमध्ये खास
}एकूण 56 साखळी सामने होतील.
}प्लेऑफ 24, 25, 27 मे ला होईल.
}29 मे रोजी फायनल मुंबईत होईल.
}मुंबईमध्ये इंग्लंडचा बटलर खेळेल.
}दिल्लीचे कर्णधारपद जहीर खान भूषवेल.
} द्रविड दिल्लीचा मेंटर म्हणून कार्यरत.
} सुनील नरेन खेळण्याची शक्यता कमी.
} कॅलिस यंदा केकेआरचा कोच असेल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, IPL रंगारंग सोहळ्याचे फोटो आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ