आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE IPL 9, 2nd Match: Kolkata Knight Riders V Delhi Daredevils At Kolkata, Apr 10, 2016

कोलकात्याने दिल्लीला ९८ धावांत गुंडाळले; ९ विकेटने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या युवा संघाला अवघ्या ९८ धावांत गुंडाळले. यानंतर कर्णधार गौतम गंभीर (नाबाद ३८) आणि राॅबिन उथप्पाच्या (३५) फलंदाजीच्या बळावर केकेआरने १४.१ षटकांत ९९ धावा काढल्या. केकेआरने ९ विकेटने दणदणीत विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून गंभीर-उथप्पाने ९.४ षटकांत ६९ धावांची सलामी दिली. उथप्पाने ३३ चेंडूंत ७ चौकारांसह ३५ धावा काढल्या. गंभीरने ४१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांसह नाबाद ३८ धावा काढल्या. मनीष पांडेनेही नाबाद १५ धावांचे योगदान दिले.

दिल्लीने गुडघे टेकले
तत्पूर्वी, दिल्लीच्या एकाही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावा काढता आल्या नाहीत. दिल्लीकडून सर्वाधिक १७ धावा सलामीवीर क्विंटन डिकॉकने काढल्या. यजमान केकेआरने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीला बोलावले. दिल्लीने २ षटकांत २३ धावा काढून आक्रमक सुरुवात केली. मात्र, आंद्रेे रसेलने तिसऱ्या षटकात डिकॉकला बाद करून दिल्लीचा वेग कमी केला. रसेलने याच षटकात श्रेयस अय्यरला आणि पुढच्या षटकात मयंक अग्रवालला बाद करून दिल्लीचे कंबरडे मोडले. दिल्लीची टीम दबावात आली. दिल्लीची टीम या दबावातून अखेरपर्यंत सावरू शकली नाही. संपूर्ण दिल्ली संघाला १०० धावासुद्धा काढता आल्या नाहीत. दिल्लीकडून डिकॉक (१७), संजू सॅमसन (१५), करुण नायर (११) आणि क्रिस मोरिस (११) यांनाच दोनअंकी धावसंख्या काढता आली. इतरांनी गुडघे टेकले.

डुमिनी संघाबाहेर
आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार जे.पी. डुमिनीला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय दिल्लीला चांगलाच महागात पडला. डुमिनी संघात असता तर मधल्या फळीत फलंदाजीला कामी आला असता.

गोलंदाज चमकले
केकेआरकडून रसेलने २४ धावांत ३ तर ब्रेड हॉगने १९ धावांत ३ गडी बाद केले. हेस्टिंग आिण पीयूष चावलाने प्रत्येकी २ गडी बाद केले. हॉग आणि चावला यांनी प्रत्येकी १६ चेंडू निर्धाव टाकले.

गुजरात लायन्ससमोर किंग्ज पंजाबचे आव्हान
मोहाली | मागच्या सत्रात गुणतालिकेत तळाचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब यंदा इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विजयी सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असेल. किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर सोमवारी आयपीएलमधील नवीन संघ गुजरात लायन्सचे आव्हान असेल. किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम या वेळी बदललेली दिसेल. मागच्या सत्रातील बरेच खेळाडू यंदा संघात नाहीत. शिवाय द. आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरकडे पंजाबचे नेतृत्व आहे. गुजरात लायन्सचे नेतृत्व सुरेश रैनाकडे आहे. कागदावर तरी गुजरात लायन्सची टीम अधिक मजबूत दिसत आहे.
पुढे वाचा.. धावफलक