आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE IPL Auction 2017: All You Need To Know About 351 Players Auction For IPL 10

IPL10 - स्टोक्स, मिल्स, नटराजनने गाजवली बोली, स्टोक्स 14.5 कोटींत पुण्याने घेतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - आयपीएल-10 साठी झालेल्या लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रँचायझींनी खूपच रस दाखवला. इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स या वर्षी सर्वात महाग विकला गेला. त्याला बेस प्राइसपेक्षा (२ कोटी) सातपट जास्त किंमत देऊन पुणे सुपरजायंट्सने १४.५ कोटी रुपयांत विकत घेतले. पुण्याकडे १९.१ कोटी रुपयांची पर्स  होती. त्यापैकी दोनतृतीयांश एकाच खेळाडूवर खर्च केले. ते पहिल्यांदाच लिलावात सहभागी झाले होते. 
 
सर्वाधिक बेस प्राइस असलेल्या सात खेळाडूंमध्ये स्टोक्सचा समावेश होता. त्याच्यावर सर्वात आधी मुंबईने बोली लावली. त्यानंतर बंगळुरू, दिल्ली व हैदराबादने बोली लावली. मात्र शेवटी पुण्याने १३.५ कोटींची, तर हैदराबादने १४ कोटींची बोली लावली.
 
पुण्याने १४.५ कोटींत स्टोक्सला विकत घेतले. स्टोक्स आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. दुसरा सर्वात महागडा खेळाडूही इंग्लंडचाच ठरला. वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १२ कोटींत विकत घेतले.

भारतीयांत कर्ण शर्मा, टी. नटराजन महागडे : भारतीय युवा खेळाडूंत लेगस्पिनर कर्ण शर्मा आणि वेगवान गोलंदाज टी. नटराजन सर्वांत महागडे ठरले. कर्ण शर्माला ३.२ कोटींत मुंबई इंडियन्सने घेतले, तर नटराजनला ३ कोटींत किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.
 
कोण आहे हा नटराजन ?
टी. नटराजन : किंग्ज इलेव्हन पंजाबने ३ कोटींत खरेदी केले. तो भारताकडून दुसरा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. त्याची मूळ किंमत १० लाख रुपये होती. अर्थात त्याला ३० पट अधिक रक्कम मिळाली. 

कारण : तुफानी वेगवान गोलंदाज आहे. तामिळनाडू प्रीमियर लीगचा हीरो. एका षटकांत सर्व यॉर्कर टाकून चर्चेत आला. नटराजन युवा स्टार गोलंदाज बनला  आहे.
 
वडील साडी कंपनीत कामाला; अाईची हातगाडी  
२५ वर्षीय थंगारासू नटराजन २० व्या वर्षांपर्यंत टेनिस बाॅलवर खेळत हाेता. दाेन भाऊ अाणि तीन बहिणींमध्ये ताे सर्वात माेठा अाहे. ताे शाळा किंवा महाविद्यालयाकडून खेळला नव्हता.  नटराजनचे वडील हे एका साडी कंपनीमध्ये काम करतात. अाई रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर खाण्याच्या वस्तू विकते. नटराजनने संकटातून इथपर्यंतचा मार्ग काढला.
 
मागचा हीरो, यंदा फुस्स
पवन नेगी मागच्या सत्रात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मागच्या वेळी त्याला ८.५ कोटींत दिल्लीने खरेदी केले होते. या वेळी त्याचा फुसका बार झाला. या वेळी त्याला आरसीबीने १ कोटींत खरेदी केले. मागच्या सत्रात त्याचे प्रदर्शन साधारण होते. यामुळे या वेळी त्याला कमी किंमत मिळाली.
 
९७ क्रिकेटपटू कोट्यधीश, सर्वाधिक १६ दिल्लीकडे
आयपीएल १० च्या बोली प्रक्रियेनंतर एकूण ९७ खेळाडू कोट्यधीश बनले आहेत. यात सर्वाधिक १६ कोट्यधीश दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात आहेत. तर सर्वात कमी १० कोट्यधीश रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत आहेत. असे असले तरीही दिल्लीत एकाही खेळाडूचे वेतन १० काेटींपेक्षा अधिक नाही.
 
बोली प्रक्रियेत या खेळाडूंना होती जोरदार मागणी
मिल्स : डेथ ओव्हरचा तज्ज्ञ 
२४ वर्षीय टायमल मिल्स इंग्लंडचा डेथ ओव्हरचा तज्ज्ञ गोलंदाज आहे. ताशी १४४ ते  १५० किमी वेगाने तो गोलंदाजी करू शकतो. मात्र, त्याच्याकडे ४ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.
 
रबाडा : ५ पट किंमत अधिक
द. आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ५ कोटींत खरेदी केले. त्याची बेस प्राइस १ कोटी होती. त्याला पाच पट अधिक किंमत मिळाली. 
 
बोल्ट : विकेट घेण्यात माहीर 
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला कोलकाता नाइट रायडर्सने ५ कोटींत खरेदी केले. त्याची मूळ किंमत १.५ कोटी होती. सुरुवातीच्या षटकात विकेट घेण्यात तो तरबेज आहे.
 
नवा गोलंदाज पॅट कमिन्स 
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४.५ कोटींत खरेदी केले. टी-२० क्रिकेटमध्ये ७.८१ च्या इकॉनमी रेटने ६६ विकेट घेतल्या आहेत. 

लिलावात कोणावर किती लागली बोली 
 
खेळाडू देश प्रकार बेस प्राइस किंमत मिळाली टीम
इयान मॉर्गन इंग्लंड फलंंदाज 2 कोटी 2 कोटी किंग्स इलेवन पंजाब
पवन नेगी भारत ऑलराउंडर 30 लाख 1 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
अॅंजिलो मॅथ्यूज श्रीलंका ऑलराउंडर 2 कोटी 2 कोटी दिल्ली डेयरडेविल्स
बेन स्टोक्स इंग्लंड ऑलराउंडर 2 कोटी 14.5 कोटी रायझिंग पुणे सुपरजायंट्स
कोरी अॅंडरसन न्यूझिलंड ऑलराउंडर 1 कोटी 1 कोटी दिल्ली डेयरडेविल्स
निकोलस पूरन वेस्ट इंडीज विकेटकीपर 30 लाख 30 लाख मुंबई इंडियन्स
कॅगिसो रबाडा साउथ अाफ्रीका बॉलर 1 कोटी 5 कोटी दिल्ली डेयरडेविल्स
ट्रेन्ट बोल्ट न्यूझिलंड बॉलर 1.5 कोटी 5 कोटी कोलकाता नाइट राइडर्स
टॅमल मिल्स इंग्लंड बॉलर 50 लाख 12 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
पॅट कमिंस ऑस्ट्रेलिया बॉलर 2 कोटी 4.5 कोटी दिल्ली डेयरडेविल्स
मिशेल जॉन्सन ऑस्ट्रेलिया बॉलर 2 कोटी 2 कोटी मुंबई इंडियन्स
अंकित बवाने भारत फलंदाज 10 लाख 10 लाख दिल्ली डेयरडेविल्स
तन्मय अग्रवाल भारत फलंदाज 10 लाख 10 लाख सनराइजर्स हैदराबाद
मोहम्मद नबी अफगानिस्तान ऑलराउंडर 30 लाख 30 लाख सनराइजर्स हैदराबाद
कृष्णप्पा गौतम भारत ऑलराउंडर 10 लाख 2 करोड़ मुंबई इंडियंस
राहुल तेवतिया भारत ऑलराउंडर 10 लाख 25 लाख किंग्स इलेवन पंजाब
एकलव्य द्विवेदी भारत विकेटकीपर 30 लाख 75 लाख सनराइजर्स हैदराबाद
अनिकेत चौधरी भारत बॉलर 10 लाख 2 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंलगुरु
टी. नटराजन भारत बॉलर 10 लाख 3 कोटी किंग्स इलेवन पंजाब
नाथू सिंह भारत बॉलर 30 लाख 50 लाख गुजरात लायन्स
बासिल थम्पी भारत बॉलर 10 लाख 85 लाख गुजरात लायन्स
एम. अश्विन भारत बॉलर 10 लाख 1 कोटी दिल्ली डेयरडेविल्स
टीएस बरोका भारत बॉलर 10 लाख 10 लाख गुजरात लायन्स
राशिद खान अफगानिस्तान बॉलर 50 लाख
4 करोड़
सनराइजर्स हैदराबाद
प्रवीण तांबे भारत बॉलर 10 लाख 10 लाख सनराइजर्स हैदराबाद
क्रिस वोक्स
इंग्लंड ऑलराउंडर 2 कोटी 4.2 कोटी कोलकाता नाइट राइडर्स
कर्ण शर्मा भारत ऑलराउंडर 30 लाख 3.2 कोटी मुंबई इंडियन्स
ऋषी धवन भारत ऑलराउंडर 30 लाख 55 लाख
कोलकाता नाइट रायडर्स
मॅट हेनरी न्यूझीलंड बॉलर 50 लाख 50 लाख
किंग्ज इलेव्हन पंजाब
जयदेव उनदकड़ भारत बॉलर 30 लाख 30 लाख रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
वरुण अॅरॉन भारत बॉलर 10 लाख 2.8 कोटी किंग्ज इलेव्हन पंजाब
मनप्रीत गोनी भारत बॉलर 30 लाख 60 लाख गुजरात लायन्स
मार्टिन गुप्टिल न्यूझीलंड बॅट्समन 50 लाख 50 लाख किंग्ज इलेव्हन पंजाब
जेसन रॉय इंग्लंड बॅट्समन 1 कोटी 1 कोटी गुजरात लायन्स
सौरभ तिवारी भारत बॅट्समन 30 लाख 30 लाख मुंबई इंडियन्स
क्रिस जॉर्डन इंग्लंड  ऑलराउंडर 50 लाख 50 लाख सनराइजर्स हैदराबाद
नाथन कोल्टर-नील ऑस्ट्रेलिया बॉलर 1 कोटी 3.5 कोटी   कोलकाता नाइटरायडर्स
प्रवीण दुबे
भारत ऑलराउंडर 10 लाख 10 लाख रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
नवदीप सैनी
भारत बॉलर 10 लाख 10 लाख दिल्ली डेअरडेव्हिल्स
बेन लॉघलिन
ऑस्ट्रेलिया बॉलर 30 लाख 30 लाख सनराइजर्स हैदराबाद
बिली स्टैनलेक
ऑस्ट्रेलिया बॉलर 30 लाख 30 लाख रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
मोहम्मद सिराज
भारत बॉलर 20 लाख 2.6 कोटी सनराइजर्स हैदराबाद
राहुल चहर
भारत बॉलर 10 लाख 10 लाख रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
सौरभ कुमार
भारत बॉलर 10 लाख 10 लाख रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
ए. गुरुनाथन
श्रीलंका बॅट्समन 30 लाख 30 लाख मुंबई इंडियन्स
डेनियल क्रिस्टियन
ऑस्ट्रेलिया ऑलराउंडर 1 कोटी 1 कोटी रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
डैरेन सैमी
वेस्ट इंडिज ऑलराउंडर 30 लाख 30 लाख गुजरात लायन्स
रोवमैन पॉवेल
वेस्ट इंडीज ऑलराउंडर 30 लाख 30 लाख कोलकाता नाइटरायडर्स
मुनाफ पटेल
भारत बॉलर 30 लाख 30 लाख गुजरात लायन्स
रिंकू सिंह
भारत बॅट्समन 10 लाख 10 लाख किंग्ज इलेव्हन पंजाब
शशांक सिंह
भारत ऑलराउंडर 10 लाख 10 लाख दिल्ली डेअरडेव्हिल्स
मिलिंद टंडन
भारत ऑलराउंडर 10 लाख 10 लाख रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
कुलावत खजरोलिया
भारत बॉलर 10 लाख 10 लाख मुंबई इंडियन्स
चिराग सूरी
यूएई बॅट्समन 10 लाख 10 लाख गुजरात लायन्स
शैली शौर्य
भारत बॉलर 10 लाख 10 लाख गुजरात लायन्स
शुभम अग्रवाल
भारत बॉलर 10 लाख 10 लाख गुजरात लायन्स
संजय यादव
भारत ऑलराउंडर 10 लाख 10 लाख कोलकाता नाइट रायडर्स 
इशांक जग्गी
भारत बॉलर 10 लाख 10 लाख कोलकाता नाइट रायडर्स 
राहुल त्रिपाठी
भारत बॉलर 10 लाख 10 लाख रायझिंग पुणे सुपरजाइंट्स
प्रथम सिंह
भारत ऑलराउंडर 10 लाख 10 लाख गुजरात लायन्स
 
 
ऑक्शनमध्ये प्रथमच सहभागी होणार या दोन देशांचे क्रिकेटर 
- आयपीएल ऑक्शनमध्ये प्रथमच आयसीसीशी सलग्न देशांचे क्रिकेटर सहभागी होत आहेत. 
- यामुळे अफगाणिस्तानचे पाच आणि यूएईचा एका खेळाडूवर बोली लागणार आहे. 
- अफगाणचा असगर स्टेनिक्झाई, मो. नबी, मो. शहजाद, राशिद खान आणि दौलत जरदान आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी होत आहेत. 
- UAE चा बॅट्समॅन चिराग सुरी देखील आयपीएल ऑक्शन लिस्टमध्ये आहे.
- या सहा खेळाडूंपैकी मो. शहजाद आणि राशिद खान यांना सर्वाधिक बेस प्राइस 50 लाख रुपये आहे. 

प्रत्येक टीम 14 मॅच खेळणार 
- टूर्नामेंट 47 दिवस वेगवेगळ्या 10 ग्राऊंडवर खेळली जाणार आहे. 
- प्रत्येक टीम 14 मॅच खेळेल, त्यातील 7 मॅच टीमच्या होम ग्राऊंडवर होईल. 
 
ठाकूर-शिर्के यांच्या हकालपट्टीनंतरची पहिली आयपीएल
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के यांची हकालपट्टी होऊन नव्या चार सदस्यीय प्रशासकीय पॅनलच्या नियुक्तीनंतर ही पहिली आयपीएल आहे. बोलीत 351 खेळाडू सहभागी होतील. यात 122 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या वेळी बोलीत सहा असोसिएट देशांच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 799 खेळाडूंनी बोलीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. यातील 351 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. सर्व संघांचे मिळून एकूण 148.33 कोटी रुपयांचे पर्स आहे. सर्वाधिक पर्स किंग्ज इलेव्हन पंजाबकडे आहे. सकाळी 9 वाजेपासून बोली प्रक्रियेला सुरुवात होईल. 

सर्वाधिक ब्रेस प्राइस दोन कोटींची आहे. यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, इयान मोर्गन, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन, पॅट कमिन्स यांच्याशिवाय लंकेचा अँज्लो मॅथ्यूजचा समावेश आहे. 1.5 कोटी रुपये आधार किंमत असलेल्या खेळाडूंत जॉनी बेयरस्ट्रो, ट्रेंट बोल्ट, ब्रेड हॅडिन, केली अॅबोट, जेसन होल्डरचा समावेश आहे.
 
भारताच्या या खेळाडूंवर असेल लक्ष :
हैदराबादचा हिटर तन्मय अग्रवाल, केरळचा गोलंदाज बेसिल थंपी, केरळचा सलामीवीर विष्णू विनोद आणि झारखंडचा युवा स्टार ईशांक जग्गी यांच्यावर बोलीत नजर असेल. 
 
इंग्रजांची डिमांड अधिक 
टीम या वेळी इंग्लिश खेळाडूंना खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. बेन स्टोक्सची सर्वाधिक मागणी आहे. मोर्गन लीगमध्ये तीन संघांसाठी खेळला आहे. बटलर मुंबईसाठी, सॅम बिलिंग्स दिल्लीसाठी, जॉर्डन बंगळुरूसाठी खेळला आहे. द. आफ्रिकेचे खेळाडू मेनंतर आयपीएल खेळणार नाहीत, तर इंग्लंडचे खेळाडू दोन टप्प्यांत माघार घेतील. 
 
टीम आणि पर्स 
पंजाब23.35 कोटी रु. 
दिल्ली 23.10 कोटी रु. 
हैदराबाद 20.9 कोटी रु. 
कोलकाता 19.75 कोटी रु. 
रायझिंग पुणे 17.5 कोटी रु. 
गुजरात लायन्स 14.35 कोटी रु. 
बंगळुरू 17.82 कोटी रु. 
मुंबई इंडियन्स 11.55 कोटी रु. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...