आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • LIVE Knight Riders Vs Daredevils, IPL 2017 Match 32nd Kolkata Eden Gardens

गंभीर-उथप्पाची फटकेबाजी; रायडर्सकडून दिल्ली पराभूत; दिल्ली टीमचा पाचवा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉबिन उथप्पाने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. - Divya Marathi
रॉबिन उथप्पाने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या.
काेलकाता- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार गाैतम गंभीर (नाबाद ७१) अाणि राॅबिन उथप्पा (५९) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्सने अायपीएल-१० मध्ये शानदार विजय संपादन केला. यजमान काेलकाता संघाने शुक्रवारी घरच्या मैदानावर जहीर खानच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला. काेलकात्याने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकात्याने लीगमध्ये सातव्या विजयाची नाेंद करताना अव्वल स्थानावर धडक मारली. दुसरीकडे दिल्लीचा स्पर्धेतील हा पाचवा पराभव ठरला. 

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने ६ बाद १६० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकात्याने १६.२ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. काेलकात्याकडून गाैतम गंभीर व उथप्पाने शतकी भागीदारी करून विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर जॅक्सनने नाबाद १२ धावांची खेळी करून गंभीरसाेबत संघाचा विजय निश्चित केला. दिल्लीच्या सॅमसनचे (६०) अर्धशतक व्यर्थ ठरले. 
 
उथप्पाचे अर्धशतक
केकेअारच्या  विजयात गंभीर व राॅबिन उथप्पाने शतकी भागीदारीचे याेगदान दिले.    यात  राॅबिन उथप्पाने ३३ चेंडूंत ५ चाैकार व ४ षटकाराने ५९ धावा काढल्या. गंभीरने नाबाद ७१ धावांची खेळी केली. 
 
गंभीरचा उदारपणा
कर्णधार गाैतम गंभीर शनिवारी दिल्लीविरुद्ध सामन्यात सामनावीरचा मानकरी ठरला. या वेळी त्याला पुरस्कार व त्या स्वरूपात मिळालेली रक्कम सुकमामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना समर्पित केली.
 
अंकित चमकला
अाैरंगाबादचा युवा  अंकित बावणे अापल्या  अायपीएल पदार्पणात चमकला. त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना १२ चेंडूंत एका चाैकारासह नाबाद १२ धावा काढल्या. 
 
धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स     धावा     चेंडू     ४    ६ 
संजू सॅमसन पायचीत गाे. उमेश यादव    ६०    ३८    ०४    ३
करुण नायर पायचीत गाे. नरेन    १५    १७    ०३    ०
श्रेयस पायचीत गाे. कुल्टर-नाइल    ४७    ३४    ०४    १
ऋषभ पंत पायचीत गाे. कुल्टर-नाइल    ०६    ०४    ०१    ०
मॉरिस झे. वाेक्स गाे. कुल्टर-नाइल    ११    १०    ०१    ०
अॅंडरसन धावचीत (जाॅन्सन/गंभीर)    ०२    ०५    ००    ०
अकिंत बावणे नाबाद    १२    १२    ०१    ०
पॅट कमिंन्स नाबाद    ००    ००    ००    ०

अवांतर : ०७ एकूण : २० षटकांत ६ बाद १६० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४८, २-१२३, ३-१३१, ४-१४०, ५-१४६, ६-१५९. गोलंदाजी : नॅथन कुल्टर-नाइल ४-०-३४-३, उमेश यादव ४-०-३८-१, वाेक्स ३-०-२०-०, सुनील नरेन ४-०-२५-१, कुलदीप यादव ४-०-२७-०, काेलीन डी १-०-१५-०.

काेलकाता नाइट रायडर्स      धावा     चेंडू     ४    ६
सुनील नरेन त्रि. गाे.कागिसाे रबाडा    ०४    ०४    ०१    ०
गौतम गंभीर नाबाद    ७१    ५२    ११    ०
रॉबिन उथप्पा धावबाद    ५९    ३३    ०५    ४
मनीष पांडे त्रि. गो. रबाडा     ०५    ०४    ०१    ०
जॅक्सन नाबाद    १२    ०५    ०२    ०

अवांतर : १०. एकूण : १६.२ षटकांत  ३ बाद १६१ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-९, २-११७, ३-१३९. गोलंदाजी : जहीर खान १.१-०-८-०, रबाडा ३.२-०-२०-२, अँडरसन २.५-०-२७-०, क्रिस मॉरिस ३-०-३९-०, कमिन्स ३-०-२२-०, अमित मिश्रा ३-०-३६-०. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...