आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL10: गुजरात 7 गड्यांनी विजयी; बंगळुरूचा सहावा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुरुवारी दहाव्या सत्राच्या अायपीएलमधील सहावा सामना गमावला. सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने दमदार पुनरागमन करताना अापल्या अाठव्या सामन्यात बंगळुरूला १३.५ षटकांत धूळ चारली. गुजरातने गुरुवारी ७ गड्यांनी सामना जिंकला. गुजरातने तिसऱ्या विजयाची नाेंद केली. बंगळुरूचा नऊ सामन्यांत हा सहावा पराभव ठरला.  

सामनावीर अँयू टाय (३/१२) व रवींद्र जडेजा (२/२८) यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे कंबरडे माेडलेल्या राॅयल चॅलेजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३४ धावा काढल्या. सुरेश रैना (नाबाद ३४) अाणि  फिंच (७२) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर गुजरात लायन्सने ३ गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला.  अॅराेन फिंचने झंझावाती ७२ धावांची खेळी करताना विजयात माेलाचे याेगदान दिले. गुजरातची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर मॅक्लुम (३)  व ईशानने १८ धावांचे याेगदान दिले.   

रैना-फिंचची विजयी भागीदारी : गुजरातचा कर्णधार रैनाने अॅराेन फिंचसाेबत झंझावाती फलंदाजी करताना विजयी भागीदारी रचली. या दाेघांनी तिसऱ्या गड्यासाठी ९२ भागीदारी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला.   यात फिंचने ७२ धावांचे याेगदान दिले. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि सहा षटकारांच्या अाधारे ७२ धावांची खेळी केली. रैनाने ३० चेंडूंत ४ चाैकार व एका षटकारासह नाबाद ३४ धावा काढल्या. 
 

टाय, रवींद्र जडेजा चमकले 
गुजरातकडून अँयू टाय व रवींद्र जडेजाने  बंगळुरूचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. टायने  १२ धावा देत ३ व जडेजाने  २८ धावा देऊन दाेन बळी घेतले.  
 
काेहली,   गेल फ्लाॅप 
बंगळुरूकडून   काेहली, गेल, डिव्हिलर्स फ्लाॅप ठरले.  काेहलीने १०, गेलने ८ व  डिव्हिलर्सने ५ धावा काढल्या. केदार (३१) व पवन नेगीने (३२) झुंज दिली. 
 
धावफलक
रॉयल चँलेजर्स बंगळुरू     धावा     चेंडू     ४    ६ 
गेल झे. कार्तिक गो. टाय     ०८    ११    ०१    ०
कोहली झे. फिंच गो. थम्पी     १०    १३    ००    १
डिव्हिलर्स धावबाद     ०५    ११    ००    ०
हेड झे. रैना गो. टाय      ००    ०१    ००    ०
केदार जाधव त्रि. गो. जडेजा      ३१    १८    ०४    १
मनदीप झे. जडेजा गो. टाय      ०८    १४    ००    ०
पवन नेगी झे. थम्पी गो. सोनी     ३२    १९    ०३    २
ब्रदी झे. किशन गो. जडेजा     ०३    ०३    ००    ०
अरविंद झे. मॅक्लुम गो. फॉकनर    ०९    १६    ००    ०
अंकित चौधरी नाबाद    १५    १२    ०१    ०
यजुवेंद्र चहल धावबाद     ०१    ०२    ००    ०
अवांतर : १२ एकूण : २० षटकांत सर्वबाद १३४ धावा. गडी बाद क्रम : १-२२, २-२२, ३-२२, ४-५८, ५-६०, ६-१००, ७-१०५, ८-११०, ९-१३३, १०-१३४. गोलंदाजी : नथूसिंग २-०-८-०, थंम्पी ४-०-३४-१, टाय ४-०-१२-३, जडेजा ४-०-२८-२, अंकित सोनी ३-०-२८-१, फॉकनर ३-०-१५-१.
गुजरात लायन्स     धावा     चेंडू     ४    ६
किशन पायचित गो. ब्रदी      १६    ११    ०४    ० 
मॅक्युलम झे. डिव्हिलर्स गो. ब्रदी     ०३    ०६    ००    ० 
सुरेश रैना नाबाद    ३४    ३०    ०४    १
फिंच झे. डिव्हिलर्स गो. नेगी    ७२    ३४    ०५    ६
रवींद्र जडेजा नाबाद     ०२    ०४    ००    ०
अवांतर : ८. एकूण : १३.५ षटकांत  ३ बाद १३५ धावा. गडी बाद क्रम : १-१८, २-२३, ३-११५. गोलंदाजी : सॅमुअल बद्री ३-०-२९-२, श्रीनाथ अरविंद ३-०-१९-०, अंकित चौधरी २-०-२१-०, यजुवेंद्र चहल ३-०-२९-०, पवन नेगी २-०-२४-१, हेड ०.५-०-११-०.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...