आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE South Africa Tour Of India, 3rd ODI: India V South Africa At Rajkot

तिसरा वनडे : टीम इंडियाचा पुन्हा पराभव, द. आफ्रिकेचा भारतावर १८ धावांनी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट येथे शतकी खेळीदरम्यान आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक. - Divya Marathi
राजकोट येथे शतकी खेळीदरम्यान आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक.
राजकोट - विराट कोहली (७७) आणि रोहित शर्माच्या (६५) दमदार अर्धशतकानंतरही टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने राजकोट वनडेत टीम इंडियाला १८ धावांनी पराभूत केले. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७० धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला ६ बाद २५२ धावाच काढता आल्या. यापूर्वी आफ्रिकेने पहिला वनडे, तर भारताने दुसरा सामना जिंकला होता. आता मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना २२ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होईल.

विजयासाठी आवश्यक २७१ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी ४१ धावांची सलामी दिली. धवनने २९ चेंडूंचा सामना करताना १३ धावा काढल्या. यानंतर रोहित शर्मा-विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. रोहित ६५ धावा काढून बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर धोनी आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून डाव सावरला. धोनीने ६१ चेंडूंत ४७ धावा काढल्या. कोहलीने ९९ चेंडूंत ७७ धावांचे योगदान दिले. कोहलीची संथ फलंदाजी मारक ठरली.

रैना पुन्हा अपयशी : रहाणेला या वेळी सहाव्या क्रमांकावर संधी मिळाली. पाचव्या क्रमांकावर रैनाला तर भोपळाही फोडता आला नाही. २ चेंडूंत ० धावा काढणाऱ्या रैनाला ताहिरने बाद केले. रहाणेही (४) सहाव्या क्रमांकावर अपयशी झाला.
तत्पूर्वी, सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या शानदार १०३ धावांच्या शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ७ बाद २७० धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. डिकॉकशिवाय फॉप डुप्लेसिसने ६३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली.

डिकॉक-डुप्लेसिसची भागीदारी
मिलर-कॉकने जोडीने पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. मिलरने ४१ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांच्या साहाय्याने ३३ धावा काढल्या. हाशिम आमला (५) पुढे येऊन खेळण्याच्या नादात यष्टिचीत झाला. नंतर कॉक-डुप्लेसिसने ११८ धावांची शतकी भागीदारी केली.

कर्णधार डिव्हिलर्स स्वस्तात बाद
शतकवीर डिकॉक दुहेरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. यानंतर पुढच्या षटकात अक्षर पटेलने आफ्रिकन कर्णधार एल्बी डिव्हिलर्सला पायचीत केले. डिव्हिलर्स केवळ ४ धावा काढू शकला. डुमिनीला (१४) मोहितच्या चेंडूवर रैनाने झेलबाद केले. स्टेनने ९ धावा काढल्या. तो धावबाद झाला.

डिकॉकचे सातवे शतक
डिकॉकचे हे सातवे आणि भारताविरुद्ध चौथे शतक ठरले. डुप्लेसिसनेसुद्धा मालिकेत सलग तिसरे अर्धशतक काढले. मोहित शर्माने ६२ धावांत २ गडी बाद केले. हरभजनसिंग, अक्षर, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पुढे वाचा.. रोहित शर्माचे झुंजार अर्धशतक व्यर्थ..