आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका दौरा : इशांतची जोरदार बॉलिंग, 121 धावा काढून श्रीलंकेच्‍या संघ परतला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकेट घेतल्‍यानंतर इशांत शर्मा. - Divya Marathi
विकेट घेतल्‍यानंतर इशांत शर्मा.
कोलंबो - सराव सामन्‍यातील दुस-या दिवशी श्रीलंका अध्‍यक्षीय इलेव्‍हन संघ 121 धावा काढून बाद झाला आहे. जोरदार गाेलंदाजी करून 5 गडी बाद इशांत शर्मा या विजयाचा शिलेदार ठरला आहे. त्‍याआधी भारतीय संघाने 351 डोंगर उभा केला होता.
इशांत शर्माने 23 धावा देत घेतल्‍या 5 विकेट
भारतीय टीमच्‍या गोलंदाजीमध्‍ये कर्णधार विराट कोहलीने इशांत शर्माला दुसरा ओव्‍हर दिला. त्‍याने पहिल्‍याच चेंडून श्रीलंकेच्‍या फलंदाजाला पाणी पाजले. एकूण 7 षटकांमध्‍ये त्‍याने 23 धावा काढून 5 गडी बाद केले. कुशल सिल्वा (0), धनंजया डीसिल्वा (0), उपुल थरांगा (0), लाहिरू थिरिमाने (5), कुसल परेरा (0) अशा पाच गड्यांना त्‍याने बाद केले आहे.
जयसूर्याला आरोन ने केले आउट
शेहान जयसूर्या (7) हा धावबाद झाला. वरुण आरोनच्‍या षटकात रिद्धिमान साहाने त्‍याला झेलबाद केले. त्‍यानंतर आरोनच्‍याच षटकात सिरीवर्धना (32) झेलबाद झाला. साहाने त्‍याला कॅचअाऊट केले. गुनाथिलाका (28) याला आर. अश्विनने बाद केले. उमेश यादवने त्‍याला कॅचआऊट केले.
टीम इंडियाचा 351 धावा
टीम इंडियाला पहिल्‍या इनिंगमध्‍ये 351 धावा काढता आल्‍या. अजिंक्य रहाणेने शानदार शतक ठाेकले. 127 चेंडूंमध्‍ये 11 चौकार आणि 1 षटकार त्‍याला लगावता आला. शिखर धवनने अर्धशतक केले. 102 चेंडूत 7 चौकार झोडत त्‍याने 62 धावा काढल्‍या.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून फोटोसह पाहा, भारतीय संघाची कामगिरी..