आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20: टीम इंडिया चॅम्पियन! भारताची श्रीलंकेवर 9 विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाने मालिकेतील अखेरच्या टी-२० सामन्यांत श्रीलंकेला ९ विकेटने पराभूत करून दणकेबाज विजय मिळवला. भारताकडून आर. अश्विनने ८ धावांत ४ विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी लंकेला १८ षटकांत ८२ धावांत गुंडाळले. यानंतर भारताने १३.५ षटकांत १ बाद ८४ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. पहिला पुणे येथील सामना गमावल्यानंतर भारताने रांची येथील दुसरा सामना जिंकला. अश्विन सामनावीर आणि मालिकावीर या दोन्हींचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्माच्या रूपाने एकमेव विकेट गमावली. १३ चेंडूंत १ षटकार, एका चौकाराच्या साह्याने १३ धावा काढणाऱ्या रोहितला चामिराने पायचीत केले. यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही. धवन-रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८.३ षटकांत नाबाद ५५ धावांची भागीदारी करून विजय खेचून आणला. धवनने नाबाद ४६ तर रहाणेने नाबाद २२ धावा काढल्या. धवनने ४६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ५ चौकार मारले, तर रहाणेने २४ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. दोघांनी जोखीम न घेता भागीदारी केली.

आता टीम इंडिया बांगलादेशात होणाऱ्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत खेळेल. त्यानंतर ८ मार्चपासून भारतात वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत सहभागी होईल.

८२ धावांत धुव्वा
प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा अवघ्या ८२ धावांत धुव्वा उडाला. लंकेकडून शनाकाने १९ आणि टी. परेराने १२ धावा काढल्या. या दोघांनाच दोनअंकी धावसंख्या गाठता आली. इतरांनी खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. डिकवेला (१), दिलशान (१), चांदिमल (८), गुणारत्ने (४), सिरिवर्धने (४) यांचे अपयश श्रीलंकेला भोवले.

सर्वात माेठा विजय
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने अागामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर माेठ्या विजयाची नाेंद केली. भारताने रविवारी श्रीलंकेवर ३७ चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा टी-२० हा सर्वात माेठा विजय ठरला. यापूर्वी २०१० मध्ये भारताने अफगाणिस्तानवर ३१ चेंडू राखून मात केली हाेती.
पुढे वाचा... अश्विनच्या फिरकीची जादू, धावफलक