आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 2nd Test, Day 2 At Visakhapatnam ACA Cricket YSR Stadium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND vs ENG: अश्विनचे 5 बळी, कोहलीचे अर्धशतक; टीम इंडिया मजबूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुअर्ट ब्रॉडने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. - Divya Marathi
स्टुअर्ट ब्रॉडने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले.
विशाखापट्टणम - अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या (५/६७) घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात २५५ धावांवर रोखून महत्त्वपूर्ण अशी २०० धावांची आघाडी घेतली. यानंतर भारताने दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ५६ धावा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद २२ धावांच्या बळावर ९८ धावा काढून तिसऱ्या दिवसअखेर २९८ धावांची आघाडी घेतली. भारताने तिसऱ्या दिवशीच सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. अश्विनने कसोटी कारकीर्दीत २२ व्यांदा डावात ५ गडी बाद करण्याची कामगिरी केली.

इंग्लंडला १०२.५ षटकांत २५५ धावांत गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवसचा खेळ संपला, तोपर्यंत भारताने ३४ षटकांत ३ बाद ९८ धावा काढल्या होत्या. भारताला पहिल्या डावात २०० धावांची आघाडी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात भारताची सुरुवात अत्यंत सुमार झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (३), लोकेश राहुल (१०) अपयशी ठरले. दोन्ही सलामीवीरांना वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराला जेम्स अँडरसनने त्रिफळाचीत केले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर विकेट घेतल्या. भारताने ४० धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. यानंतर विराट कोहली व रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. या दोघांनी गोलंदाजांना लगाम लावला.

स्टोक्स, बेयरस्ट्रोची झुंज
तिसऱ्या दिवशी सकाळी इंग्लंडवर फॉलोऑनचे संकट होते. मात्र, मधल्या फळीचा फलंदाज बेन स्टोक्स (७०) व बेयरस्ट्रोने (५३) अर्धशतके ठोकून इंग्लंडला संकटातून बाहेर काढले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी केली. अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या इंग्लंडने जेवणाच्या ब्रेकनंतर चार विकेट ३० धावांत गमावल्या. अश्विनने ६७ धावांत ५ गडी बाद केले. मो. शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा व जयंत यादवने प्रत्येकी १ बळी घेतला. इंग्लंडने शुक्रवारी पहिल्या डावात १०३ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. स्टोक्स आणि बेयरस्ट्रो यांनी इंग्लंडचा डाव सावरताना जेवणाच्या ब्रेकपर्यंत स्कोअर ६ बाद १९१ धावा असा केला.
ब्रॉडच्या फिटनेससाठी इंग्लंड संघ चिंतित
इंग्लंडला वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या फिटनेसची चिंता आहे. सामन्यादरम्यान त्याला पायाचे स्कॅन करावे लागले. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉड हात व उजव्या पायातील वेदनेमुळे खेळू शकला नव्हता. त्याला मैदानाबाहेर जावे लागले. ब्रॉडच्या दुखापतीमुळे टीम संकटात सापडली. वोग्स आधीच दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या जागी जेम्स अँडरसन दुखापतीतून सावरत पुनरागमन करत आहे. बॅकअप म्हणून स्टीव्हन व जेक बॉलसारखे खेळाडू संघात आहेत.
जयंतचे सरस पदार्पण
भारताचा युवा गाेलंदाज जयंत यादवने सरस खेळीच्या बळावर अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत एक बळी घेतला. त्याने माेईन अलीला पायचीत केले. या विकेटचे श्रेयही त्याने वृद्धिमान साहाला दिले.
धावफलक
भारत पहिला डाव ४५५.
इंग्लंड पहिला डाव धावा चेंडू ४ ६
(कालच्या ५ बाद १०३ धावांवरून पुढे)
स्टोक्स पायचीत गो. अश्विन ७० १५७ ११ ०
बेयरस्ट्रो त्रि. गो. उमेश ५३ १५२ ०५ ०
आदिल रशीद नाबाद ३२ ७३ ०६ ०
अन्सारी पायचीत गो. जडेजा ०४ ०९ ०१ ०
ब्रॉड पायचीत गो. अश्विन १३ २६ ०१ ०
अँडरसन पायचीत गो. अश्विन ०० ०१ ०० ०
अवांतर : ९. एकूण : १०२.५ षटकांत सर्वबाद २५५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४, २-५१, ३-७२, ४-७९, ५-८०, ६-१९०, ७-२२५, ८-२३४, ९-२५५, १०-२५५.
भारत दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
विजय झे. रुट गो. ब्रॉड ०३ २५ ०० ०
राहुल झे. बेयरस्ट्राे गो. ब्रॉड १० ३१ ०२ ०
पुजारा त्रि. गो.अँडरसन ०१ २४ ०० ०
विराट कोहली नाबाद ५६ ७० ०६ ०
अजिंक्य रहाणे नाबाद २२ ५४ ०२ ०
अवांतर : ६. एकूण : ३४ षटकांत ३ बाद ९८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१६, २-१७, ३-४०. गोलंदाजी : जेम्स अँडरसन ८-१-१६-१, स्टुअर्ट ब्रॉड ६-५-६-२, आदिल रशीद १२-१-३७-०, बेन स्टोक्स ५-०-२५-०, मोईन अली ३-१-९-०.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, दुस-या कसोटीतील आजची क्षणचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...