आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 2nd Test, Day 5 At Visakhapatnam ACA Cricket YSR Stadium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 वर्षांत भारताचा इंग्लंडवर 246 धावांनी विजय; विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कसोटीत 248 धावा करणा-या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. कसोटी जिंकताच विराटने असे सेलिब्रेशन केले. - Divya Marathi
या कसोटीत 248 धावा करणा-या विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. कसोटी जिंकताच विराटने असे सेलिब्रेशन केले.
विशाखापट्टणम - टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा २४६ धावांनी पराभव केला. ४०५ धावांचा पाठलाग करताना टीम इंग्लंड १५८ धावांवर सर्वबाद झाली. धावांच्याबाबतीत हा ३० वर्षांतील भारताचा इंग्लंडवरचा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी १९८६ मध्ये २७९ धावांनी विजय मिळवला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कर्णधार विराट कोहलीला मिळाला. कोहलीने सामन्यात १६७ आणि ८१ धावांची खेळी केली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसऱ्या कसोटीला २६ नोव्हेंबरपासून मोहलीत सुरुवात होईल.

राजकोट कसोटी ड्रॉ झाल्यानंतर टीम इंडिया थोडी दबावात आली होती. यानंतर विशाखापट्टणम येथे टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी करताना पाचही दिवस संघर्ष केल्यानंतर इंग्लंडला हरवले. पाचव्या दिवशी इंग्लंडने आपल्या अखेरच्या ८ विकेट ६६ धावांत गमावल्या. याचे श्रेय भारतीय फिरकीपटूंना जाते. ऑफस्पिनर अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी ३, तर रवींद्र जडेजाने २ गडी बाद केले. वेगवान गोलंदाज मोहंमद शमीने रुट आणि रशिद या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इंग्लंडकडून विकेटकिपर फलंदाज जॉनी बेयरस्ट्रोने ४० चेंडूंचा सामना करताना नाबाद ३४ धावा काढल्या. तो एका टोकाला टिकून होता. दुसऱ्या टोकाने एकेक गडी बाद होत होते. जेवणाच्या ब्रेकनंतर ४.३ षटकांच्या खेळानंतर इंग्लंडचा डाव आटोपला. इंग्लंडने जेवणाच्या ब्रेकपर्यंत ९३ षटकांत ७ बाद १४२ धावा काढल्या होत्या. जेवणानंतर अन्सारीला शून्यावर अश्विनने ित्रफळाचीत केले. अश्विनची ही तिसरी विकेट होती. आपल्या करिअरचा पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जयंत यादवने नंतरचे दोन्ही विकेट आपल्या नावे केल्या. त्याने स्टुअर्ट ब्रॉड (५) आणि जेम्स अँडरसन (०) यांनी पायचीत करून इंग्लंडचा डाव १५८ धावांत गुंडाळला.

२१ वेळा डीआरएसचा उपयोग
विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही संघांनी एकूण २१ वेळा (इंग्लंड १२, भारत ९) डीआरएसचा उपयोग केला. सामन्याच्या वेळी ६ वेळा मैदानी पंचांचा निर्णय बदलण्यात आला. यात प्रत्येकी तीन वेळा दोन्ही संघांच्या निर्णयाला बदलले. बदललेल्या ६ निर्णयांपैकी ४ निर्णय मैदानी पंच रॉड टकर यांनी दिले, तर २ निर्णय कुमार धर्मसेना यांचे बदलले.

विजयाचे ०५ हीरो
१. जयंत यादव (पदार्पण): अष्टपैलू कामगिरी. पहिल्या डावात दीड तास खेळपट्टीवर टिकून ३५ धावा, तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा काढल्या. जयंतने एकूण ४ गडी बाद केले. ३ विकेट त्याने दुसऱ्या डावात घेतल्या. २ चेंडूंत २ विकेट घेतल्या.
२. मो. शमी : पहिल्या डावात कुक आणि दुसऱ्या डावात जो. रुटची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. हे सामन्याचे टर्निंग पॉइंट ठरले.
३. चेतेश्वर पुजारा
पहिल्या डावात ११९ धावा काढल्या. २ बाद २२ अशा संकटातून बाहेर काढले.
४. विराट कोहली
१६७ आणि ८१ धावा. कर्णधार म्हणून प्रथमच तर एकूण तिसऱ्यांदा ‘मॅन ऑफ द मॅच’.
५. आर. अश्विन
५८ धावा, ८ विकेट. अश्विन २०१६ मध्ये सर्वाधिक ५५ विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

मैदान भाग्यशाली
हे मैदान खूप भाग्यशाली आहे. अॅडिलेडला मला जसा अनुभव येतो, तसेच येथेही वाटते. खूप जण सामना पाहण्यास आले. यामुळे आपल्याला चांगली कामगिरी करावी लागते. हे चाहतेच संकटातून बाहेर काढण्यास खेळाडूला प्रेरित करतात. - विराट कोहली, भारतीय कर्णधार.

निराशाजनक पराभव
आम्ही खूप मेहनत आणि संघर्ष केला. त्यानंतरही पराभूत झाल्याने मी निराश आहे. पहिल्या दिवशी येथे फलंदाजी करणे सोपे होते. त्यानंतर येथे धावा काढणे कठीण काम झाले. दुसऱ्या डावात आम्ही अखेरपर्यंत संघर्ष केला नाही. - अॅलेस्टर कुक, पराभवानंतर.

हेही आहे महत्त्वाचे
- २०१६ मध्ये भारतीय संघाने अातापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. २०१६ मध्ये एकही कसोटी न गमावणारा भारत एकमेव संघ आहे. भारताने २०१६ मध्ये ९ कसोटी खेळताना ६ मध्ये विजय मिळवला. ३ सामने ड्रॉ झाले.
- इंग्लंडचा डावखुरा फलंदाज बेन डकेट अत्यंत वाईट फॉर्मात आहे. या मालिकेत ऑफस्पिनर अश्विनने त्याला तीन वेळा बाद केले. मालिकेत त्याने अश्विनच्या ४० चेंडूंचा सामना करताना १५ धावा काढल्या. सोमवारीही तो फिरकीपुढे फेल झाला. तो शून्यावर बाद झाला.
- जेम्स अँडरसन सोमवारी शून्यावर बाद झाला. कसोटीत २१ वेळा शून्यावर बाद होणारा अँडरसन इंग्लंडकडून यादीत नंबर वन आहे.
- सोमवारी इंग्लंडला पराभूत करून भारताने एकाही पराभवाशिवाय सलग १५ कसोटी सामने जिंकले. एक टीम म्हणून ही कामगिरी संयुक्तपणे दुसऱ्यांदा झाली. याआधी इतकेच सामने खेळून २०१५ मध्ये श्रीलंकेने अशी कामगिरी केली होती. भारताने १९८५-९७ या कालावधीत सर्वाधिक १७ कसोटी सामने जिंकले होते.
- भारताचा हा धावांच्या (२४६) अंतराने इंग्लंडवर दुसरा मोठा विजय ठरला. याआधी १९८६ मध्ये लीड्स येथे भारताने २७९ धावांनी विजय मिळवला होता. पहिली राजकोट कसोटी ड्रॉ झाली होती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, विशाखापट्टणम कसोटीतील महत्त्वाची क्षणचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...