आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 3rd Test, Day 1 At Mohali Chandigarh I.S. Bindra PCA Stadium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND v ENG: इंग्लंड दिवसअखेर 8 बाद 268, बेयरस्ट्राच्या अर्धशतकाने लाज राखली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- मोहालीचे क्रिकेट मैदान टीम इंडियासाठी आतापर्यंत लकी ठरले आहे. हे या कसोटीच्या पहिल्या दिवशीसुद्धा सिद्ध झाले. मालिकेत १-० ने पुढे असलेल्या भारताने मोहाली येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला पहिल्या दिवशी ८ बाद २६८ धावाच काढू दिल्या. भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांना पुन्हा जाळ्यात अडकवले. इंग्लंडची टीम संकटात असताना जॉनी बेयरस्ट्रोने दमदार खेळी करून डाव सावरला. त्याने १७७ चेंेडूंचा सामना करताना ८९ धावा काढल्या. पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला.

सकाळी सुरुवातीला मो. शमी आणि उमेश यादव यांनी भारताला यश मिळवून दिले. नंतर फिरकीपटूंनी इंग्लंडला जाळ्यात अडकवले. एकापाठोपाठ एक विकेटमुळे इंग्लंडची टीम बॅकफूटवर गेली. जयंत यादव, रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले, तर मोहंमद शमी आणि आर. अश्विनने प्रत्येकी एकाला टिपले.

इंग्लंडने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडने १० षटकांत ३२ धावांची सलामी दिली. हमीदच्या रूपाने उमेश यादवने इंग्लंडला पहिला धक्का दिला. तो ९ धावेवर असताना उमेशच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. दुसरी विकेट जो. रुटच्या रूपाने पडली. ऑफस्पिनर जयंत यादवने रुटला १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद केले. या धक्यातून इंग्लिश टीम सावरण्याच्या आधीच अॅलेस्टर कुकही २७ धावा काढून बाद झाला. कुकला अश्विनने पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. जेवणाच्या आधी मोईन अलीसुद्धा एक चुकीचा फटका मारून बाद झाला. शमीच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात मोईनचा झेल विजयने घेतला. ८७ धावांत ४ विकेट गेल्याने इंग्लिश टीम बॅकफूटवर आली होती.

जडेजाने स्टोक्सला बाद केले : यानंतर पाचव्या विकेटसाठी इंग्लंडकडून स्टोक्स-बेयरस्ट्रोने ५७ धावांची भागीदारी केली. जडेजाला पुढे येऊन मारण्याच्या नादात स्टोक्स २९ धावांवर यष्टिचीत झाला. इंग्लंडची टीम ५ बाद १४४ अशी संकटात सापडली. यानंतर जोस बटलरने आपली निवड सार्थ ठरवताना झुंज दिली. बटलरने ४३ धावांची खेळी केली. जडेजाच्या गोलंदाजीवर कर्णधार कोहलीने झेल घेऊन त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावले. यानंतर जॉनी बेयरस्ट्रोला ८९ धावांवर जयंत यादवने पायचीत केले. तळाचा फलंदाज क्रिस वोग्सने २५ धावांचे योगदान दिले.
अश्विनवर कोहली रागावला
सामन्यादरम्यान कर्णधार कोहली अश्विनवर रागावला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात मो. शमीच्या चेंडूवर कुकचा झेल जडेजाला समजला नाही आणि त्याला जीवदान मिळाले. यानंतर अकराव्या षटकात शमीने पुन्हा एकदा कुकला जाळ्यात अडकवण्याची योजना केली. या वेळी चेंडू अश्विनच्या हाती गेला. मात्र, अश्विनने झेल सोडला. यामुळे कर्णधार कोहली त्याच्यावर चांगलाच रागावला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव धावा चेंडू ४ ६
कुक झे. पार्थिव गो. अश्विन २७ ४२ ०६ ०
हमीद झे. रहाणे गो. उमेश ०९ ३१ ०१ ०
रुट पायचीत गो. जयंत १५ १३ ०३ ०
मोईन झे. विजय गो. शमी १६ ४५ ०१ १
बेयरस्ट्रो पायचीत गो. जयंत ८९ १७७ ०६ ०
स्टोक्स यष्टिचीत गो. जडेजा २९ ५९ ०५ ०
बटलर झे. कोहली गो. जडेजा ४३ ८० ०५ ०
वोक्स त्रि. गो. उमेश २५ ७० ०३ ०
रशिद नाबाद ०४ २४ ०० ०
बेट्टी नाबाद ०० ०० ०० ०
अवांतर : ११.
एकूण : ९० षटकांत ८ बाद २६८ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम : १-३२, २-५१, ३-५१, ४-८७, ५-१४४, ६-२१३, ७-२५८, ८-२६६. गोलंदाजी : मो. शमी २०-५-५२-१, उमेश यादव १६-४-५८-२, जयंत यादव १५-५-४९-२, आर. अश्विन १८-१-४३-१, रवींद्र जडेजा २१-३-५६-२
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मोहाली कसोटीतील क्षणचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...