आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 4th Test, Day 3 At Mumbai Wankhede Stadium

IND vs ENG: कोहली, विजयच्या शतकांनी टीम इंडिया मजबूत स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने 15 वे शतक ठोकल्यानंतर प्रेक्षकांना असे अभिवादन केले. - Divya Marathi
विराटने 15 वे शतक ठोकल्यानंतर प्रेक्षकांना असे अभिवादन केले.
मुंबई - कर्णधार विराट कोहलीचे १५ वे कसोटी शतक (नाबाद १४७) आणि सलामीवीर मुरली विजयच्या (१३६) धावांच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवअअखेर ७ बाद ४५१ धावा काढल्या. कोहली, विजयच्या शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. भारताकडे ५१ धावांची आघाडी झाली असून, अजून ३ विकेट शिल्लक आहेत.

मुरली विजयने २८२ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १० चौकारांच्या साह्याने १३६ धावांची खेळी केली, तर कोहलीने २४१ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार मारत नाबाद १४७ धावा ठोकल्या. या दोघांच्या शतकी खेळीने भारताचा डाव मजबूत केला. कोहलीने अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केली. शतकानंतरही कोहलीने टिकून खेळण्यावर जोर दिला. कोहलीसोबत दुसऱ्या टोकाला युवा खेळाडू जयंत यादव ३० धावांवर नाबाद आहे. जयंतने कोहलीला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागीदारी केली. जयंतने ८६ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार मारले. जयंतने कोहलीला चांगली साथ देताना सुरुवातीला इंग्लंडच्या स्कोअरची बरोबरी केली. त्यानंतर ५१ धावांची आघाडी घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. चेतेश्वर पुजाराने ४७ धावांचे योगदान दिले. कोहलीने मुरली विजयसोबत तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची, तर रवींद्र जडेजासोबत (२५) सातव्या विकेटसाठी ५७ धावांची आणि नंतर जयंत यादवसोबत ८७ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या सत्रात चार विकेट
दुसऱ्या सत्रात टीम इंडियाने चार विकेट गमावल्या. या सत्रात कोहली आणि विजय यांच्यातील ११६ धावांची भागीदारी मोडली. विजय बाद झाल्यानंतर करुण नायर (१३), पार्थिव पटेल (१५) आणि आर. अश्विन (०) हेसुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताने पहिल्या सत्रात १०१ धावा काढल्या. दुसऱ्या सत्रातही इतक्याच धावा निघाल्या.
अखेरच्या सत्रात मिळाली आघाडी
दिवसाच्या अखेरच्या सत्रात रवींद्र जडेजा २५ धावा काढून बाद झाला. या सत्रात कोहली-जडेजाची भागीदारी मोडली. मात्र, भारताने ४०० धावांचा टप्पा या सत्रात ओलांडला. सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडिया १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

३५ वर्षांनी भारतीय कर्णधाराच्या ५०० धावा
कोहलीने या मालिकेत चार कसोटींच्या ७ डावांत ५५२ धावा काढल्या. ३५ वर्षांनी एखाद्या भारतीय कर्णधाराने एका मालिकेत ५०० चा आकडा गाठला आहे. याआधी सुनील गावसकर यांनी १९८१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ कसोटींत ५०० धावा काढल्या होत्या.

४००० धावा काढणारा १४ वा भारतीय
कोहलीने कसोटीत ४००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ८९ व्या डावात त्याच्या ४१०६ धावा झाल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १४ वा फलंदाज ठरला. सर्वात कमी डावात येथे पोहोचणाऱ्यांत तो सहावा आहे.
अश्विनने २३ व्या वेळी कसोटीत ५ गडी बाद करून कपिल देवची बरोबरी केली-
- २३ व्यांदा अश्विनने कसोटीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. यासह भारताकडून सर्वाधिक ५ घेण्याच्या यादीत अश्विनने कपिलदेवची बरोबरी केली आहे. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे असून दुसऱ्या स्थानी हरभजनसिंग आहे. हरभजनला मागे टाकण्यासाठी अश्विनला आणखी २ वेळा ५ विकेट घ्याव्या लागतील.
- ७ व्यांदा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम अश्विनने २०१६ मध्ये केला आहे. मुरलीधरननंतर (२००० आणि २००१) असा दुसरा गोलंदाज ठरला आहे ज्याने सलग दोन वर्षे सर्वाधिक वेळा ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला.
- २०१६ मध्ये ६४ विकेट घेऊन एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेण्याच्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत रवीचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कपिलदेव एका कॅलेंडर वर्षांत ७५ बळींसह (१९८३) अव्वलस्थानी आहे.
भारताची सामन्यावर पकड- पार्थिव पटेल

इंग्लंड संघाला ३७५ धावसंख्येच्या आत गुंडाळण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवले होते. त्यापेक्षा थोड्या अधिक धावा झाल्या. क्रिकेटमध्ये असे होत असते. मात्र, आम्ही दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४६ अशी दमदार सुरुवात करून या कसोटीवरील पकड अधिक घट्ट केली आहे, असे भारताचा यष्टिरक्षक पार्थिव पटेल याने सांगितले.

खेळपट्टी दोन्ही संघांना सारखीच आहे. मात्र, आमच्या गोलंदाजांनी त्यावर अधिक चांगली गोलंदाजी केल्यामुळेच आम्हाला विकेट मिळाल्या. भारतीय संघ इंग्लंडच्या धावसंख्येपासून अडीचशे धावा दूर आहे. आम्ही आघाडी घेऊन कसोटीवरील पकड आणखी मजबूत करू, असा विश्वास आहे. विजयने या मालिकेत आपल्या खेळात खूपच सुधारणा केली, असे तो म्हणाला.
राफेल पंचगिरी करू शकणार नाहीत-

- डोक्यावर चेंडू लागल्यामुळे जखमी झालेले पंच पॉल राफेल स्वस्थ आहेत.
- मात्र, काळजी म्हणून भारत-इंग्लंडदरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या उर्वरित दिवशी ते पंचगिरी करणार नाहीत.
- डॉक्टरांनी राफेल यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे शुक्रवारी आयसीसीने सांगितले.
- भुवनेश्वरकुमारच्या एका थ्रोवर राफेल जखमी झाले होते.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई कसोटीची क्षणचित्रे....
बातम्या आणखी आहेत...