आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 4th Test, Day 4 At Mumbai Wankhede Stadium

IND Vs ENG: विराट कोहलीचे विक्रमी द्विशतक, भारत विजयापासून केवळ 4 विकेट दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विराट कोहलीच्या शानदार द्विशतकानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध मुंबई कसोटीत रविवारी मजबूत स्थितीत पोहोचली आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ४०० धावांच्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात कोहलीचे (२३६), जयंत यादव (१०४) यांच्या २४१ धावांच्या भागीदारीच्या बळावर सर्वबाद ६३१ धावा काढल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात मजबूत अशी २३१ धावांची आघाडी घेतली. भारतीय फिरकीपटूंच्या बळावर चौथ्या दिवसअखेर इंग्लंड दुसऱ्या डावात ६ बाद १८२ धावा अशी संकटात सापडला होता. इंग्लंड अद्याप ४९ धावांनी मागे आहे. तर भारताला विजयासाठी 4 विकेट पाहिजे आहेत.

भारताने सकाळी ७ बाद ४५१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कोहली-जयंत यादवने आठव्या विकेटसाठी २४१ धावांची भागीदारी केली. जेवणाच्या ब्रेकनंतर जयंतने आपले पहिले शतक (१०४) पूर्ण केले. जयंत १०४ धावांवर बाद झाला. कोहली २३५ धावा काढून बाद झाला. यानंतर भारताचा डाव ६३१ धावांवर आटोपला.

इंग्लंडची गचाळ सुरुवात
२३१ धावांनी मागे पडलेल्या इंग्लंडची दुसऱ्या डावात गचाळ सुरुवात झाली. जेनिंंग्स ०, कुक १८,मोईन ०, स्टोक्स २ धावा काढून बाद झाले. रुट ७७ धावा काढून बाद झाला. जॉनी बेयरस्ट्रो ५० धावांवर खेळत आहे. जडेजा, अश्विनने प्रत्येकी २ गडी बाद केले.
जयंत बनला पहिला भारतीय
आपल्या तिसऱ्या कसोटीत खेळणाऱ्या जयंत यादवने ९ व्या क्रमांकावर येऊन १०४ धावांची खेळी केली. ८४ वर्षांच्या इतिहासात नवव्या क्रमांकावर शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला.
ब्रॅडमनची बरोबरी
कर्णधार म्हणून एका वर्षांत तीन द्विशतकासह कोहलीने सर डॉन ब्रॅडमन, रिकी पॉटिंग आणि न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्लुमची बरोबरी केली.ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क चार द्विशतकासह सर्वांत पुढे आहे.

येथे ब्रॅडमनच्या मागे : कर्णधार म्हणून कोहलीच्या फलंदाजीची सरासरी ६५.५० अशी झाली आहे. नेतृत्व करताना २००० पेक्षा अधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत कोहलीची सरासरी सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर कोहली पोहोचला आहे. ब्रॅडमन यांची कर्णधार म्हणून १०१.५१ अशी सरासरी आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विक्रमवीर कोहली
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...