आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग्ज पंजाबचा राॅयल विजय; राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ गड्यांनी मात, पंजाबचा दुसरा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- हाशिम अामला (नाबाद ५८) अाणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने (नाबाद ४३) झंझावाती फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबला साेमवारी दहाव्या सत्राच्या अायपीएलमध्ये राॅयल विजय मिळवून दिला. पंजाबच्या टीमने अापल्या दुसऱ्या सामन्यात शेन वाॅटसनच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ गड्यांनी मात केली. पंजाबचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. यासह पंजाबने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे बंगळुरूला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना राॅयल चॅलेजर्स बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ४ बाद १४८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या टीमने १४.३ षटकांमध्ये २ गड्यांच्या माेबदल्यात सामना जिंकला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबकडून मनन वाेहरा अाणि हाशिम अामलाने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी बंगळुरूच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. यात वाेहराने ३४ धावांचे याेगदान दिले. 

अामला-मॅक्सवेलची विजयी भागीदारी : हाशिम अामलाने पंजाबच्या झटपट विजयासाठी कर्णधार ग्लेन मॅक्सवेलसाेबत झंझावाती खेळी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य ७२ धावांची भागीदारी रचून पंजाबचा विजय निश्चित केला. यात मॅक्सवेलने नाबाद ४३ धावांचे याेगदान दिले. त्याने २२ चेंडूंत ३ चाैकार व ४ षटकारांसह ही महत्त्वपूर्ण खेळी केली.  

नाणेफेक जिकंून कर्णधार शेन वाॅटसनने प्र‌थम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र,फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या राॅयल चॅलेंजर्सची निराशाजनक सुरुवात झाली. किंग्ज इलेव्हन पंजाबचा युवा गाेलंदाज अक्षर पटेलने शानदार खेळीच्या बळावर वाॅटसनचा निर्णय साफ चुकीचा ठरवला. त्याने  सहाव्याच चेंडूवर कर्णधार वाॅटसनला (१) त्रिफळाचीत करून पंजाबला महत्त्वाचा पहिला बळी मिळवून दिला. त्यापाठाेपाठ विष्णू विनाेदही (७)अाल्या पावली तंबूत परतला. दरम्यान केदार जाधवनेही (१) माेठी निराशा केली. 
 
डिव्हिलर्सचे झंझावाती अर्धशतक व्यर्थ
संकटात सापडलेल्या बंगळुरू टीमला सावरण्यासाठी डिव्हिलर्सने कंबर कसली. त्याने एकाकी झंुज देताना संंघाचा डाव सावरला. यादरम्यान त्याने धावसंख्येचा अालेख उंचावताना वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. त्याने ४६ चेंडूंत ३ चाैकार अाणि ९ उत्तुंग षटकारांच्या अाधारे नाबाद ८९ धावांची शानदार खेळी केली.  यादरम्यान, त्याने मनदीपसाेबत चाैथ्या विकेटसाठी ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. 

अक्षर पटेल ठरला सामनावीर
किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचा युवा खेळाडू अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण याेगदान दिले. त्याने गाेलंदाजी करताना चार षटकांत अवघ्या १२ धावा देत १ गडी बाद केला. तसेच फलंदाजीमध्ये ९ धावांची खेळी केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...