Home »Sports »From The Field» India Vs Australia, 3rd Test, Day 3 At Ranchi JSCA International Stadium

IND-AUS Test: चेतेश्वर पुजाराचे शतक; तिसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत

दिव्‍य मराठी वेब टीम | Mar 19, 2017, 04:37 AM IST

  • या मालिकेत भारताकडून शतक ठोकणारा पुजारा पहिला खेळाडू ठरला आहे.
रांची- तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १३०) कसोटी करिअरमधील अकराव्या शतकाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३६० धावा काढल्या. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. भारत पहिल्या डावात अजूनही ९१ धावांनी मागे आहे. सामना आता रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतापुढे आघाडी घेण्याचे आव्हान असेल.

दुसऱ्या दिवशीचा नाबाद फलंदाज पुजारा (१०*) तिसऱ्या दिवशीसुद्धा मैदानावरून नाबाद परतला. पुजारा १३० धावा काढून अजून खेळपट्टीवर टिकून आहे. पुजाराने ३२८ चेंडूंत १७ चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी केली. पुजारासोबत वृद्धिमान साहा १८ धावा काढून खेळपट्टीवर आहे. या मालिकेत भारताकडून शतक ठोकणारा पुजारा एकमेव भारतीय आहे.

कमिन्सची शानदार गोलंदाजी
दिवसभरात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. जखमी मिशेल स्टार्कच्या जागी संघात ५ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या कमिन्सने ५९ धावांत भारताचे सर्वाधिक ४ गडी बाद केले. जेवणाच्या ब्रेकनंतर कमिन्सने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या विकेट घेतल्या.

जखमी कोहलीची फलंदाजी
विराट कोहली मोठी खेळी करू शकला नाही. मात्र, त्याने दुखापतीची िचंता दूर करताना फलंदाजी केली. कोहली ६ धावा, अजिंक्य रहाणे १४ धावा, करुण नायर २३ धावा आणि अश्विन ३ धावा काढून बाद झाले. सकाळी भारताकडून विजय ८२ धावांवर बाद झाला. विजय-पुजाराने १०२ धावांची शतकी भागीदारी केली.

पुजाराचे शतक
जेवणाच्या ब्रेकनंतर भारताने २ बाद १९३ वरून सुरुवात केली. ७५ व्या षटकात पुजाराने चौकार मारून भारताला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने याच षटकात ५० धावा पूर्ण केल्या. पुजाराने एका टोकाने टिकून फलंदाजी करताना २१४ चेंडूंत १४ चौकारांच्या साहाय्याने शतक ठोकले.

कांगारूंनी कोहलीला डिवचले
विराटला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोहलीची टिंगल उडवून जल्लोष केला. बाद झाल्यानंतर खेळाडूंनी रडक्या बाळाचा आवाज काढून कोहलीला डिवचले. मॅक्सवेलने चेंडू अडवून खांद्याला हात लावून कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला.
असा झाला तिसऱ्या दिवसाचा खेळ
- तिसऱ्या दिवशी भारताच्‍या डावाची सुरुवात चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली‍ विजय यांनी केली.
- विजय आणि पुजारीने दुसऱ्या विकेटसाठी 39.2 षटकांमध्‍ये 102 धावांची भागिदारी केली.
- 70.4 षटकामध्‍ये कीफेने मुरली विजयला बाद करत ऑस्‍ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले.
- 183 चेंडूत विजयने 82 धावांची खेळी केली. आपल्‍या खेळीदरम्‍यान विजयने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले.
- या सामन्‍यात मुरली विजयने त्‍याच्‍या टेस्‍ट करिअरचे 15वे अर्धशतक झळकावले.
- 129 चेंडूत विजयने अर्धशतक पूर्ण केले.
- ऑस्‍ट्रेलियाविरोधात त्‍याची ही सहावी अर्धशतकी खेळी होती.
- विजय बाद झाल्‍यानंर फलंदाजीसाठी उतरलेला विराट केवळ 6 धावा करुन तंबुत परतला.
- 80.4 षटकामध्‍ये कमिंसच्‍या गोलंदाजीवर स्टिव्‍हकडे झेल देत विराट आऊट झाला.
- पॅट कमिंसने भारताला चौथा झटका दिला. 91.2 षटकात पिटचा बाऊंसर बॉल खेळण्‍याच्‍या प्रयत्‍नात मॅथ्‍यु हेडकडे सोपा झेल देत अजिंक्‍य रहाणे (14) आऊट झाला.
- लंचब्रेकनंतर भारताची पाचवी विकेट पडली. 107.4 षटकामध्‍ये हेजलवुडने करुण नायरला त्रिफळाचित केले. करुन नायरने 23 धावा केल्‍या.
- 115.4 षटकात आर. अश्विन केवळ 3 धावा करुन बाद झाला. पॅट कमिंसच्‍या गोलंदाजीवर वेडने त्‍याला झेलबाद केले.
- सध्‍या चेतेश्‍वर पुजारा (130*) आणि साहा (18*) क्रिजवर आहेत.
- कालच्‍या 1 बाद 120 धावांवरुन भारताने आज आपल्‍या खेळास सुरुवात केली होती. पहिल्‍या इनिंगमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाची टीम 451 धावांवर ऑलआऊट झाली आहे.
भारतीय खेळाडूचे मालिकेतील पहिले शतक
- तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्‍या पुजाराने आज शानदार खेळी करत शतक ठोकले.
- पुजाराने 214 चेंडुत 100 धावा पूर्ण केल्‍या. आपल्‍या खेळीमध्‍ये पुजाराने 14 चौकार लगावले.
- आपल्‍या टेस्‍ट करिअरमधील पुजाराचे हे 11वे शतक होते. तर ऑस्‍ट्रेलियाविरोधात दुसरे शतक होते.
- या मालिकेत आतापर्यंत तीन शतके झाली आहेत. यातील दोन स्टिव्‍ह स्मिथ आणि एक ग्‍लेन मॅक्‍सवेलचे शतक आहे.
विराटने जोखीम पत्‍कारु नये, सुनील गावस्‍कर यांनी दिला होता विश्रांतीचा सल्‍ला
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्‍कर यांनी विराट कोहलीला जोखीम न पत्‍कारता विश्रांती करण्‍याचा सल्‍ला दिला आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असून कोहलीशिवाय भारतीय फलंदाजांनी 451 धावांपर्यंत मजल मारायला हवी. भारताची घसरगुंडी उडाली तरच विराटने फलंदाजीसाठी यावे, असे सुनील गावस्‍कर यांनी म्‍हटले आहे.
असा होता दुसऱ्या दिवसाचा खेळ
अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले. टीमच्या लेगस्पिनर रवींद्र जडेजाने शानदार गाेलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला पहिल्या डावात ४५१ धावा काढता अाल्या. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १२० धावांची खेळी केली. यात युवा सलामीवीर लाेकेश राहुलने (६७) शानदार अर्धशतकाचे याेगदान दिले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended