आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IND-SL : भारताचा श्रीलंकेवर सर्वात मोठा विजय, 239 धावा आणि डावाने केले पराभूत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - श्रीलंकेच्या विरोधातील दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. नागपूरच्या जामठा येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 239 धावा आणि डावाने धुव्वा उडवला. भारताच्या आर अश्विनने चार, तर इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 

 

त्याआधी तिसरा दिवस हा भारतीय फलंदाजांनी गाजवला. विराट कोहलीने द्विशतक तर रोहित शर्माने शतक करत तिसऱ्या दिवशी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.  

 

अश्विनच्या सर्वात वेगवान 300 टेस्ट विकेट्स पूर्ण

आर. अश्विनने या मॅचसह आपल्या टेस्ट करिअरच्या 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने सर्वात वेगवान 300 टेस्ट विकेट्स घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर डेनिस लिलीचे विक्रम मोडले आहे. डेनिस लिलीने 300 विकेट्स 56 सामन्यांत घेतल्या होत्या. अश्विनने तो कारनामा 54 टेस्ट सामन्यांत करून दाखवला आहे. 

 


श्रीलंकेचा दुसरा डाव 

- पहिला बळी - श्रीलंकेला पहिला धक्का दिला इशांत शर्माने त्याने समरविक्रमाला शून्यावर बोल्ड करत भारताची चांगली सुरुवात करून दिली.  
दुसरा बळी -  सोमवारी मॅचच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेला पहिला धक्का रवींद्र जडेजाने दिला.

जडेजाने 18 धावांवर खेळणाऱ्या करुणारत्नेला बाद केले. 
- तिसरा बळी - उमेश यादवने थिरिमानेला जडेजाकरवी झेलबाद केले. त्याने 23 धावा केल्या. 

- चौथा बळी - जडेजाने मॅथ्यूजला बाद केले, रोहित शर्माने त्याचा झेल घेतला. त्याने 10 धावा केल्या. 

- पाचवा बळी - त्यानंतर इशांत शर्माने डिकवेलाला बाद केले. कोहलीने त्याचा झेल घेतला. त्याने 4 धावा केल्या. 

- सहावा बळी - अश्विनच्या गोलंदाजीवर के एल राहुलने शनकाचा बळी घेतला. त्याने 17 धावा केल्या.

- सातवा बळी - अश्विनने परेराला शून्यावर पायचित बाद केले.

- आठवा बळी - हेराथला अश्विनने शून्यावर बाद केले. राहणेने त्याचा झेल घेतला. 

- नववा बळी - उमेश यादवच्या गोलंदाजीवर अश्विनने चंदिमलचा झेल घेतला. त्याने सर्वाधिक 61 धावा केल्या. 

- दहावा बळी - अश्विनने गमगे याचा त्रिफळा उडवला. तोही शून्यावर बाद झाला. 

 

 

तिसऱ्यांदा पहिल्याच डावात भारताचे चार शतकवीर

तिसऱ्य दिवशी यजमान टीम इंडियाकडून अाघाडीच्या फलंदाजांनी अापल्या घरच्या मैदानावर मनसाेक्त फटकेबाजी केली. त्यामुळे चार फलंदाजांना शतकी खेळीची नाेंद करता अाली. यामध्ये सलामीवीर मुरली विजय (१२८), चेतेश्वर पुजारा (१४३), काेहली अाणि राेहित शर्माचा समावेश अाहे. असे तिसऱ्यांदा घडले. यापूर्वी २००७ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध अाणि दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध काेलकाता कसाेटीत हा पराक्रम भारतीय फलंदाजांनी गाजवला अाहे.

 

काेहलीचे पाचवे द्विशतक

टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने संयमी खेळी करताना श्रीलंकेची गाेलंदाजी फाेडून काढली. यातून त्याने अापल्या करिअरमधील पाचवे द्विशतक ठाेकले. त्याने २६७ चेंडूंचा सामना करताना १७ चाैकार व २ षटकारांच्या अाधारे २१३ धावांची शानदार खेळी केली. काेहलीने यंदाच्या सत्रामध्ये विक्रमी शतकांचा पल्ला गाठला. त्याचे हे १० वे शतक ठरले. कर्णधाराच्या भूमिकेत दहा शतके पूर्ण करणारा काेहली हा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याचे हे करिअरमधील १९ वे कसाेटी अाणि ५१ वे अांतरराष्ट्रीय शतक ठरले.


गावसकरांपेक्षा अधिक शतके

काेहलीने कर्णधार म्हणून १२ वे कसाेटी शतक ठाेकले. यासह त्याने अापल्याच देशाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना मागे टाकले. गावसकरांच्या नावे ११ शतके अाहेत.

 

पुढे पाहा, मॅचशी संबंधित काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...