पुणे- विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियावर घरच्याच मैदानावर पहिल्या पराभवाचे संकट घोंगावत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जागतिक क्रमवारीत नंबर १ भारतीय संघाचा डाव केवळ १०५ धावांत गुंडाळला. भारत एकवेळ ३ बाद ९३ अशा स्थितीत होता. मात्र, पुढील १२ धावांत भारताने ७ गडी गमावले. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात तब्बल १५५ धावांची आघाडी मिळाली. भारताला फॉलोऑन न देता ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात फलंदाजी करणे पसंत केले. ऑस्ट्रेलियाने दुस-या दिवसअखेर ४ बाद १४३ धावा केल्या आहेत. स्टीव स्मिथ (५९) आणि मिशेल मार्श (२१) धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाकडे आता एकून २९८ धावांची आघाडी झाली आहे. डेविड वॉर्नर १० धावांवर बाद झाला त्याला अश्विनने पायचित केले. शॉन मॉर्शला अश्विनने शून्यावर पायचित केले. पीटर हॅंडस्कॉंबला अश्विनने १९ धावांवर झेलबाद केले. मॅट रेनशॉ ३१ धावांवर बाद झाला त्याला जयंत यादवने झेलबाद केले.
भारतावर शंभरीतच गारद होण्याची नामुष्की-
-ऑस्टेलियाप्रमाणेच भारताच्याही पहिल्या डावात खराब सुरुवात झाली.
- सलामीवीर मुरली विजय १० धावांवर बाद झाला. त्याला जेश हेजलवूडने विकेटकीपर मॅथ्यू वेडकडे झेलबाद केले.
- चेतेश्वर पुजाराला मिशेल स्टार्कने ६ धावांवर बाद केल्यानंतर त्याने लागोपाठच्या चेंडूवर विराट कोहलीला शून्यावर बाद केले. त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ४४ अशी झाली होती.
- त्यानंतर सलामीवीर केएल राहुल ६४ धावा काढून बाद झाला. त्याला ओफेकने बाद केले.
- त्याच षटकात ओफेकने अजिंक्य रहाणेला (१३) आणि वृद्धीमान साहा (०) यांना बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले.
- त्यानंतर तळातील फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले.
- ऑस्टेलियाकडून ओफेकने ३३ धावांत ६ बळी टिपले. तर मिशेल स्टार्कने २ तर हेजलवूड-लॉयनने प्रत्येकी १-१ बळी टिपला.
उमेश यादव चमकला-
- भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या २६१ गुंडाळले.
- भारताकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करताना ३२ धावांत गडी बाद केले.
- याशिवाय फिरकीचे त्रिकूट रवीचंद्रन अश्विन (६३ धावांत ३ विकेट), रवींद्र जडेजा (७४ धावांत २ विकेट) आणि जयंत यादव (५८ धावांत १ विकेट) यांनी चमकदार कामगिरी केली. - ऑस्ट्रेलियाकडून २० वर्षीय सलामीवीर रेनशॉने ६८ आणि मिशेल स्टार्कने ६१ धावा काढल्या.
- टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जगातील नंबर दोनची टीम ऑस्ट्रेलियाने ८२ धावांची सलामी दिली.
- सकाळी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज दबाव निर्माण करू शकले नाहीत.
- जेवणाच्या ब्रेकनंतर डेव्हिड वॉर्नर ३२ धावा काढून बाद झाला.
- फिरकीपटू जयंत यादवने शॉन मार्शला कोहलीकरवी झेलबाद केले. यानंतर आलेला पीटर हँड्सकोंबही खास कामगिरी करू शकलेला नाही.
- त्याने ४५ चेंडूंत चौकारांसह २२ धावा काढल्या. जडेजाने त्याला पायचित केले.
- ऑस्ट्रेलियाने जेवणाच्या ब्रेकनंतर तीन विकेट १७ धावांच्या अंतरात गमावल्या.
- हँडसकोब आणि कर्णधार स्टिवन स्मिथ १४९ च्या स्कोअरवर बाद झाले. स्मिथने केवळ २७ धावा काढल्या.
- भारतीय ऑफस्पिनर आर. अश्विनने कर्णधार विराट कोहलीकरवी स्मिथला झेलबाद केले.
- १६६ च्या स्कोअरवर मिशेल मार्श बाद झाला. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने ६९ धावा काढून विकेट गमावल्या.
अखेरच्या सत्रात विकेट-
- चहापानानंतरमिशेल मार्श, मॅथ्यू वेड, रेनशॉ, स्टिव ओकिफे आणि नॅथन लॉयन यांच्या विकेट पडल्या.
- जडेजाने मिशेल मार्शला पायचित केले. तर उमेश यादवने वेडला पायचित केले.
- रेनशॉने अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयकडे झेल दिला. ओकिफे आणि लॉयन ८२ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर बाद झाले.
पुढे स्लाईडद्नारे पाहा, पुणे कसोटीतील क्षणचित्रे...