आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Updates Of India Vs Australia, 1st Test, Day 3 At Pune: As It Happened

भारताचा लाजिरवाणा पराभव, ओकिफे, लॉयनच्या फिरकीमुळे भारताचा 333 धावांनी पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे कसोटीत स्टीव्ह ओकिफेने ७० धावांत १२ बळी मिळवले. - Divya Marathi
पुणे कसोटीत स्टीव्ह ओकिफेने ७० धावांत १२ बळी मिळवले.
 पुणे - डावखुरा फिरकीपटू स्टिव्ह ओकिफे आणि ऑफस्पिनर नॅथन लॉयनच्या वळत्या चेंडूंपुढे टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज दुसऱ्या डावातही अवघ्या १०७ धावांत धारातीर्थी पडले. पहिल्या कसोटीचा निकाल तिसऱ्या दिवशी लागला. भारताचा पहिल्या डावात १०५ धावांत खुर्दा उडाला होता.
 
 ओकिफेने दुसऱ्या डावातही ६ गडी बाद करून टीम इंडियाचा विजयरथ रोखण्याचे काम केले. सलग १९ सामन्यांत अपराजित राहिल्यानंतर टीम इंडियाचा आपल्याच भूमीवर ३३३ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. ज्या खेळपट्टीवर भारताने सुमार प्रदर्शन केले, तेथे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (१०९) शतक ठोकले. हे त्याच्या करिअरचे १८ वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.  
 
ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ४४१ धावांचे लक्ष्य दिले होते. डावखुरा फिरकीपटू ओकिफे आणि ऑफस्पिनर नॅथन लॉयनपुढे भारताचा डाव अवघ्या ३३.५ षटकांत १०७ धावांत आटोपला. किफेने  १५ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले. त्याने सामन्यात ७० धावांत १२ गडी बाद केले, तर लॉयनने १४.५ षटकांत ५३ धावांत ४ गडी बाद केले.
 
 लॉयनने सामन्यात एकूण ५ गडी टिपले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. पुन्हा एकदा भारताची सुरुवात वाईट झाली. विजय पाचव्या  षटकात बाद झाल्यानंतर भारताची घसरण थांबली नाही. यानंतर सर्व भारतीय फलंदाजांनी केवळ हजेरी लावली.

कोहलीचे सर्वात सुमार प्रदर्शन  
- १३ धावा, वि. ऑस्ट्रेलिया, पुणे २०१७  
- २४ धावा, वि. इंग्लंड, कोलकाता २०१२  
- २६ धावा, वि. इंग्लंड, मुंबई २०१२  
- २७ धावा, वि. न्यूझीलंड, कानपूर, २०१६  
 
किफेचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन
किफेने १२ विकेट घेऊन भारतीय जमिनीवर कोणत्याही विदेशी फिरकीपटूच्या रूपात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. भारतीय भूमीवर कोणत्याही विदेशी गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. इंग्लंडच्या इयान बॉथमने १९८० मध्ये मुंबईत १०६ धावांत १३ गडी बाद केले होते.  ३२ वर्षीय किफेने याअाधी ४ कसोटींत १३ गडी बाद केले होते. याआधी एका डावात ५३ धावांत ३ विकेट, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

किफेने चौघांना केले पायचित : भारताकडे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या रूपात क्रमवारीतील नंबर वन आणि नंबर दोनचे असे दोन दिग्गज गोलंदाज आहेत. मात्र, सामन्यात खरा दम किफेने दाखवला. त्याने दुसऱ्या डावात चार फलंदाजांना (मुरली विजय, पुजारा, अश्विन, साहा) यांना पायचित केले. यानंतर विराट कोहलीला त्रिफळाचित केले. शिवाय रहाणेला लॉॅयनकरवी झेलबाद केले.
 
तिसरा मोठा विजय
ऑस्ट्रेलियाने धावांच्या अंतराने भारताविरुद्ध तिसरा मोठा विजय मिळवला. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाने नागपूर येथे भारताला ३४२ धावांनी, तर २००७ मध्ये मेलबर्न येथे ३३७ धावांनी हरवले होते. आता पुण्यात ३३३ धावांनी मात दिली.
 
भारतात जडेजाच्या १०० विकेट पूर्ण  
बळी    कसोटी    गोलंदाज  
१००    १६    अार. अश्विन  
१००    १९    रवींद्र जडेजा  
१००    १९    हरभजनसिंग  
१००    २०    प्रज्ञान ओझा  
१००    २१    अनिल कुंबळे
 
 स्टीव्हन स्मिथचे शानदार शतक...
 
- ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने संघाला गरज असताना दमदार खेळ केला.
- स्मिथने आपल्या कारकिर्दीतील १८ वे शतक ठोकले. 
- स्मिथने १८७ चेंडूंत ११ चौकारासह शतक ठोकले.
- स्मिथने अश्विन-जडेजा यांची फिरकी निष्पर्भ ठरवली. अखेर त्याला १०९ धावांवर जडेजाने पायचित केले.
-  आज सकाळी रविंद्र जडेजाने मिशेल मार्शला ३१ साहाद्वारे झेलबाद केले. त्यानंतर मॅथ्यू वेडला उमेश यादवने २० धावांवर झेलबाद केले.मिशेल स्टार्कने ३० धावा जोडल्या.
- भारताकडून आर. अश्विनने ४ विकेट तर, रविंद्र जडेजाने ३, उमेश यादवने २ तर जयंत यादवने १ गडी बाद केला.

दुस-या दिवशी पडल्या १५ विकेट- 
 
- यजमान भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. शुक्रवारी गोलंदाजांनी दबदबा कायम ठेवताना दिवसभरामध्ये १५ गडी बाद केले. 
- ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओकिफेने (६/३५) आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून टीम इंडियाची अवघ्या १०५ धावांमध्ये दाणादाण उडवली.
- यजमान भारतीय संघाने ४०.१ षटकांत आपला पहिला डावात गाशा गुंडाळला. भारताने ११ धावांच्या अंतरामध्ये एकूण सात विकेट गमावल्या. 
- भारताला आठ दशकांच्या इतिहासामध्ये अशा परिस्थितीचा सामना करावा लागला.
- दरम्यान, भारताकडून युवा फलंदाज लोकेश राहुलने (६४) एकाकी झुंज देताना अर्धशतक ठोकले. 
- इतर सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात भोपळा न फोडताच तंबूत परतला. 
- दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १४३ धावांची खेळी केली. त्यामुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाला दुस-या दिवसअखेर २९८ धावांची आघाडी मिळाली. 
- ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्मिथने शानदार अर्धशतक ठोकले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पुणे कसोटीतील क्षणचित्रे व त्यासंबंधित माहिती...
बातम्या आणखी आहेत...