आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदेश न पाळणाऱ्या बीसीसीआयला लोढा समितीचा दणका, बँकांना पैसे रोखण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोढा समितीच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या शिफारशी डावलून निर्णय घेण्याचे धाडस बीसीसीआयच्या अंगाशी आले असून, लोढा समितीने दोन बँकांना, बीसीसीआयने राज्य क्रिकेट संघटनांना मंजूर केलेला निधी रोखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनला स्टेडियमच्या डागडुजीसाठी १० कोटींचा निधी देण्यात आला होता. चॅम्पियन्स लीग रद्द करण्यात आल्यामुळे प्रसारण हक्क असणाऱ्या कंपनीकडून मिळालेली नुकसान भरपाईची रक्कम सर्व सदस्यांमध्ये वाटण्याच्या आदेशालाही हरकत घेण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला तातडीच्या कार्यकारिणी बैठकीत बीसीसीआयने हे दोन निर्णय घेतले होते. १८ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोढा समितीच्या शिफारशी आहेत तशा स्वीकारून त्यानंतरच नवे निर्णय घ्यावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. हे दोन्ही निर्णय नैमित्तिक कामकाजामध्ये समाविष्ट होत नसून लोढा समितीने बँक ऑफ महाराष्ट्र व येस बँक यांना सदर निधी असोसिएशन्सच्या खात्यात जमा करू नये, असा आदेश दिला आहे. या आदेशाची प्रत बीसीसीआय सचिव अजय शिर्के, अनिरुद्ध चौधरी व प्रमुख कार्यकारिणी अधिकारी राहुल जोहरी यांना पाठवण्यात आली आहे.

सर्व शिफारशी लागू करणे अशक्य : लोढा समितीच्या सर्वच शिफारशी लागू करणे अशक्य आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...