आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकेश राहुल प्रथमच टाॅप-10 मध्ये, वेस्ट इंडीज-पाक कसोटीनंतर आयसीसी क्रमवारी जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीम इंडियाचा युवा सलामीवीर लोकेश राहुलने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. वेस्ट इंडीजने दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांच्या बळावर पाकला ८१ धावांत गुंडाळून विजय मिळवला होता. या शानदार प्रदर्शनाचा खेळाडूंना क्रमवारीत फायदा झाला.
 
युनिस खान खास कामगिरी करू न शकल्याने फलंदाजांच्या टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. याचा फायदा भारताचा युवा सलामीवीर लोकेश राहुलला झाला. लाेकेश राहुल प्रथमच टॉप-१० मध्ये आला असून तो दहाव्या क्रमांकावर आहे. टॉप-१० मध्ये भारताचे आणखी दोन फलंदाज चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि कर्णधार विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहेत.   

पाकचा अझहर अली दोन स्थानांच्या फायद्यासह आठव्या स्थानी पोहोचला आहे. अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ कायम आहे. युनिस खान १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडीजचा रॉस्टन चेसला २१ स्थानांचा फायदा झाला असून तो ४९ व्या, शाई होप १९ स्थानांच्या फायद्यासह १०१ व्या क्रमांकावर आहे. पाकचा कर्णधार मिसबाह २० व्या क्रमांकावर आहे.   
 
कसोटीच्या टॉप-१० गोलंदाजांत कोणताही बदल झालेला नाही. भारताचा रवींद्र जडेजा नंबर वन, तर आर. अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाक आणि वेस्ट इंडीजचा एकही गोलंदाज टॉप-१० मध्ये सामील नाही. 
 
टॉप-१० फलंदाज असे  
०१. स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया  -  ९४१  
०२. केन विल्यम्सन, न्यूझीलंड  -  ८८०  
०३. जो. रुट, इंग्लंड    -    ८४८  
०४. चेतेश्वर पुजारा, भारत  -  ८४६  
०५. विराट कोहली, भारत  -  ८१८  
०६. डीकॉक, द. आफ्रिका  -  ८०२  
०७. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया  -  ७५९  
०८. अझहर अली, पाक  -  ७४८  
०९. आमला, द. आफ्रिका  -  ७४८  
१०. लोकेश राहुल, भारत  -  ७३९
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...