आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजली-सचिनप्रमाणेच वेगळी आहे मास्टर-ब्लास्टरच्या सासू सासऱ्याची Love Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या सासू अॅनाबेल मेहता. - Divya Marathi
सचिनच्या सासू अॅनाबेल मेहता.
सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजलीच्या लव्ह स्टोरीबाबत जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सचिन आणि अंजली प्रमाणेच अंजलीच्या आई वडिलांनीदेखिल लव्ह मॅरेज केले होते, हे फार लोकांना माहिती नाही. अंजली यांचे वडील गुजराथी बिझनेसमॅन कुटुंबातील आहेत. तर त्यांची आई ब्रिटीश आहे.

अशी सुरी झाली Love Story
आनंद मेहता आणि अॅनाबेल यांची भेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण सुरू असताना झाली होती. त्यावेळा अॅनाबेल सोशल अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा करत होत्या. सुरुवातीला काही भेटी झाल्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे एकमेकांचा स्वभाव समजू लागले होते. कॉलेजमध्ये सोबत शिकत असल्याने त्या दोघांची भेटही वारंवार होत होती. त्यामुळे काही दिवसांतच दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. अॅनाबेल यांना आनंद मेहता आवडू लागले होते. त्यांचा सेधेपणा आणि समजूतदारपणा पाहून अॅनाबेल इम्प्रेस झाल्या होत्या. पुढे त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांच्या लग्नात एक अडचण होती, ती म्हणजे अॅनाबेल ब्रिटीश होत्या. आनंद मेहता यांच्याशी लग्नानंतर त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाणार होते. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या अॅनाबेल भारतीय संस्कृतीत कशा रूळणार ही चिंता आनंद यांना होती. पण अॅनाबेल यांनी तयारी दाखवली आणि त्या स्वतःला या सर्वांमध्ये अॅडजस्ट करू लागल्या. लग्नानंतर लगेचच म्हणजे 1966 मध्ये त्या मुंबईत आल्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सचिनची सासुबाईंबरोबर झालेली पहिली भेट...