आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटीची \'हमर\', लाखोंची बाईक, हे आहे धोनीचे लग्झरी कार-बाईक कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली हमर H-2 कारसोबत महेंद्रसिंग धोनी. - Divya Marathi
आपली हमर H-2 कारसोबत महेंद्रसिंग धोनी.
स्पोर्ट्स डेस्क- 35 वर्षाचा (7 जुलै 1981) भारतीय संघाचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या खेळाने आणि कर्णधारपदासोबतच आणखी एका बाबीने चर्चेत राहतो ते म्हणजे त्याचे कार आणि बाईक कलेक्शन. धोनीजवळ एक दोन नाही तर तब्बल 11 हून अधिक बाईक्स आणि अनेक लग्झरी कार आहेत. 2009 मध्ये त्याने लग्झरी कार ‘हमर H-2’ खरेदी केल्यानंतर तो चर्चेत आला. त्याने ही SUV कार सुमारे 1 कोटी रूपयांना खरेदी केली होती.
काय काय आहे धोनीच्या कलेक्शनमध्ये...
धोनीचे कार कलेक्शन- ‘हमर’ शिवाय धोनीजवळ लग्झरी कार्सचे शानदार कलेक्शन आहे. यात ऑडी Q7, लॅंड रोवर फ्रीलेंडर, GMC Sierra, Ferrari 599, Mitsubishi Outlander, पजेरो SFX, टोयोटा करोला, कस्टम बिल्ट स्कॉर्पियो (ओपन) यासारख्या गाड्या त्याच्या ताफ्यात आहेत.
धोनीचे बाईक कलेक्शन- धोनीकडे बाईक कलेक्शनमध्ये यामाहाच्या जुन्या मॉडेलसह अनेक लग्झरी बाईक्स आहेत. जसे कॉन्फेडरेट X132 हॅलकेट, कावासाकी निंजा, हार्ले डेविडसन, रॉयल एनफील्ड, डुकाटी 1098 आणि टीवीएस अपाचे आदी गाड्याचे कलेक्शन आहे. धोनीजवळ 11 हून जास्त बाइक्स आहेत.
पुढे स्लाईड्सच्या मदतीने पाहा, धोनीच्या लग्झरी कलेक्शनमध्ये कोणत्या कोणत्या आहेत गाड्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...