आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्लुमच्या “ऑल टाइम प्लेइंग इलेव्हन ड्रीम टीम’ची घोषणा, संघात सचिनला स्थान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने नुकतीच आपली “ऑल टाइम प्लेइंग इलेव्हन ड्रीम टीम’ची घोषणा केली आहे. यात भारतीय खेळाडूंतून एकमेव सचिन तेंडुलकरने स्थान मिळवले आहे. मॅक्लुमच्या संघात फक्त एका भारतीय खेळाडूला स्थान मिळू शकले. मात्र, त्याच्या संघात ४ ऑस्ट्रेलियन आणि , ३ वेस्ट इंडीजचे, २ न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. 

द. अाफ्रिका संघातून एक खेळाडू आहे. मॅक्लुमच्या संघात वेस्ट इंडीजचा महान माजी खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स  कर्णधार आहे. सलामीला सचिन तेंडुलकर आणि क्रिस गेल असून, मधल्या फळीत रिकी पॉटिंग, ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स असतील.   

मॅक्लुमचा संघ असा : सचिन तेंडुलकर, क्रिस गेल, रिकी पॉटिंग, ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, जॅक कॅलिस, अॅडम गिलख्रिस्ट, मिशेल जॉन्सन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि शेन वॉर्न.
बातम्या आणखी आहेत...