आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र, पंजाब, चंदिगड बाद फेरीत दाखल, ६२ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा; यजमान महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची आगेकूच कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि क्रीडा उपसंचालक कार्यालयातर्फे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ६२ व्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, गुजरात, चंदिगड संघांनी उपउपांत्य फेरीत धडक मारली.

मुलींमध्ये छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात संघांनी उपउपांत्य फेरी गाठली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुलींच्या अखेरच्या साखळी सामन्यात यजमान महाराष्ट्राने चंदिगडवर १५-० होम रनने शानदार विजय मिळवला. सामन्यात विजेत्या संघाकडून वाणीता, वैष्णवी चव्हाण, आंचल शाहू, शिवानी आगळे, अक्षिता शाहू आणि अर्पिता देशपांडेने जबरदस्त कामगिरी करत संघाला विजयी केले. पिचर प्रतीक्षा कांबळे आणि कॅचर कविता राठोड, स्नेहा देशमुखने चांगली साथ दिली. दुसरीकडे विद्या भारती संघाने चंदिगडला १९-८ ने पराभूत केले.

हरियाणाने राजस्थानला १४-७ ने सहज पराभूत केले. हरियाणाकडून एस. राजीव सामनावीर ठरला. त्याने ३ रन काउंट केले, त्याला पिचर राकेश कुमार आणि कॅचर कृष्ण कुमारने चांगली साथ दिली.
महाराष्ट्राची विद्या भारतीवर मात
मुलांच्या गटात यजमान महाराष्ट्राने शानदार फलंदाजी करत विद्या भारती संघाला १२-० ने पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्राकडून श्रीराम चव्हाण, गौरव चौधरी, प्रतीक डुकरे, उद्धव पाटील आणि हेमंत यांनी जबरदस्त फटकेबाजी करत सर्वाधिक होम रनचा विक्रम केला. या विजयासह संघांनी उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. दुसरीकडे मध्य प्रदेशने राजस्थानवर १८-२ ने मात केली. इतर एका लढतीत गुजरातने तेलंगणाला ५-२ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...