आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याचा युवा फलंदाज झाेलचे अर्धशतक; महाराष्ट्राची बडोद्यावर ७ गड्यांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडाेदरा- जालन्याचा युवा फलंदाज विजय झाेलच्या (६४) झंझावाताच्या बळावर महाराष्ट्राने  सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार विजय संपादन केला. महाराष्ट्राने रंगतदार सामन्यात बडाेद्यावर ७ गड्यांनी मात केली. महाराष्ट्राच्या विजयात अाैरंगाबादच्या अंकित बावणेने २४ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. 
 
प्रथम फलंदाजी करताना बडाेद्याने  निर्धारित २० षटकांमध्ये ६ बाद १६८ धावांची खेळी केली हाेती. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने १९.५ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. उस्मानाबादच्या नाैशाद शेखने नाबाद २१ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्राकडून सलामीवीर अाणि कर्णधार स्वप्निल गुगळेने विजय झाेलसाेबत ३४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. गुगळेने २४ धावांचे याेगदान दिले. दरम्यान, नाैशाद शेख (२१) अाणि निखिल नाईकने (२६) चाैथ्या गड्यासाठी अभेद्य ४० धावांची भागीदारी करून महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी, बडाेद्याच्या दीपक हुडा (५३) अाणि युसूूफ पठाणने (५६) अर्धशतकी खेळी केली. इतर फलंदाज अपयशी ठरले. 

विजय झाेल-अंकित बावणेची अर्धशतकी भागीदारी 
जालन्याचा विजय झाेल व अाैरंगाबादचा युवा खेळाडू अंकित बावणे यांनी महाराष्ट्राच्या विजयासाठी अर्धशतकी भागीदारीची झंझावाती खेळी केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी संघाच्या विजयात मजबूत पाया रचला. अंकितने २८ चेंडूंत दाेन चाैकार व एका षटकारासह २४ धावा काढल्या. झाेलने ५० चेंडंूमध्ये ९ चाैकार व एका षटकाराच्या अाधारे सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली.
बातम्या आणखी आहेत...