आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे हे काय, धोनीच्या भावावर गवंडी होण्याची वेळ आली? पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फोटोत नरेंद्र धोनी वाळू, सिमेंटचा वापर करुन भिंत बांधत असल्याचे दिसत आहे. - Divya Marathi
या फोटोत नरेंद्र धोनी वाळू, सिमेंटचा वापर करुन भिंत बांधत असल्याचे दिसत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकताच आपल्या होम टाऊन रांचीमध्ये न्यूझीलंडविरूद्धचा सामना खेळला. भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नाही. त्यामुळे धोनीला आपल्या शहरात वन डे जिंकण्याची जी संधी होती हे साधता आली नाही. धोनीएकीकडे फाईव्ह स्टार हॉटेलात राहत होता व देशाचे नेतृत्त्व करत होता. त्याचवेळी त्याचा मोठा भाऊ नरेंद्रसिंग धोनी कुठेतरी गवंडी काम करत होता. एक भाऊ यशाच्या उच्च शिखरावर तर दुसरा कुठे असाच प्रश्न उपस्थित झाला. त्यातच धोनीच्या भावाने हा फोटो शेअर करत शेयरोशायरीच्या अंदाजात आपली दु:ख, व्यथा मांडली. आपल्याला माहित असेलच महेंद्रसिंग धोनीचे आणि नरेंद्रचे संबंध चांगले नाहीत. त्यामुळे धोनी रांचीत असतानाही तो त्याला भेटला नाही. तसेच धोनी देशासाठी मॅच खेळत होता तर नरेंद्र पोटासाठी काम करत होता.
मागील महिन्यात 30 सप्टेंबरला धोनीच्या ख-याखु-या जीवनावर आधारित फिल्म 'एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' रिलीज झाली. त्यात धोनीच्या लाईफमधील अनेक पैलूवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. यात त्याच्याशी संबंधित जवळच्या लोकांची कॅरेक्टर्स या फिल्ममध्ये आहे. मात्र, यात धोनीचा मोठा भाऊ नरेंद्रसिंग धोनीचे कॅरेक्टर नाही. आज आम्ही तुम्हाला याच मिसिंग कॅरेक्टरबाबत आणि गवंडी काम करताना दिसलेल्या धोनीच्या भावाबाबत सांगणार आहोत...
- नरेंद्रसिंग धोनी एक पॉलिटिशियन आहेत, जे धोनीचे होम टाउन रांचीत राहतात.
- ते 2013 पासून समाजवादी पक्षाशी जोडले गेले आहेत. ज्याचे प्रमुख मुलायम सिंग यादव आहेत.
- समाजवादी पार्टीसोबत जोडण्याआधी ते भाजपात होते. मात्र, नंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
- नरेंद्र यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1971 रोजी झाला. त्यांनी 21 नोव्हेंबर 2007 रोजी लग्न केले.
- त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. सुरुवातीच्या काळात ते धोनीसोबत राहत होते मात्र नंतर वेगळे राहू लागले. याचे कारण स्पष्ट झाले नाही.
- धोनीसोबत त्यांचा एक जुना फोटोही आहे. जो तुम्हाला पुढे स्लाईडद्वारे पाहता येईल.
- धोनीच्या आयुष्यावरील फिल्ममध्ये त्याच्या आई-वडिलांचा, बहिणीचे कॅरेक्टर आहे. मात्र, भावाबाबत काहीच सांगितले गेले नाही.
- नरेंद्र सिंग धोनींचे आयुष्य अगदीत साधे सरळ आहे. एवढेच नव्हे तर रांचीत एखाद्या क्रिकेट मॅचला गेले तर त्यांना सामान्याप्रमाणे रांगेत जाऊन तिकिट काढावे लागते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एकीकडे एमएस धोनीची सुपरस्टार लाईफ तर दुसरीकडे त्याचा भाऊ नरेंद्रसिंग धोनी कसे जगत आहे आयुष्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...