आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : धोनीऐवजी रायझिंग पुणे संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे, आयपीएल लिलावापूर्वी निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - आयपीएल फ्रँचायझी टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सने महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदावरून दूर केले आहे. पुणे संघाचे नेतृत्व आता ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे. २००७ मध्ये धोनी पहिल्यांदा कर्णधार बनला होता. तेव्हा त्याच्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले होते. तेव्हापासून १० वर्षांत प्रथमच त्याने एखाद्या संघाचे नेतृत्व न सोडता त्याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले आहे. 
 
कोणत्याही संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्याची ही धोनीच्या करिअरमधील पहिलीच वेळ आहे. धोनी पुणे संघात खेळाडू म्हणून कायम राहील. धोनीने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या वनडे, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते.  
 
...धोनीचे नेतृत्व ठरले अपयशी :  धोनीच्या नेतृत्वात २०१६ मध्ये पुण्याची टीम पूर्णपणे फ्लॉप ठरली. २०१६ च्या सत्रात पुण्याची टीम आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर होती. संघाचे प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने पुण्याचे प्रदर्शन साधारण ठरले. धोनीच्या नेतृत्वात पुणे संघाने १४ सामने खेळले. मात्र, त्यांना केवळ  ५ मध्ये विजय मिळवता आला.
 
 या दरम्यान धोनीने १ अर्धशतक ठोकले.  अायपीएल २०१६ मध्ये धोनीने पुण्याकडून खेळताना १२ डावांत १३५ च्या स्ट्राइक रेटने २८४ धावा काढल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने १५३ च्या स्ट्राइक रेटने ७ डावांत २७० धावा ठोकल्या होत्या. आयपीएलच्या एका सत्रात धोनीच्या प्रदर्शनाचा विचार केला तर त्याने मागच्या सत्रांत सर्वात कमी धावा काढल्या. आधी २०१० मध्ये धोनीने २८७ धावा काढल्या होत्या.
 
सर्व ९ आयपीएलमध्ये कर्णधार असलेला एकमेव खेळाडू : २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत ९ वेळा धोनी या लीगमध्ये कर्णधार म्हणून खेळला. आठ वेळा त्याने चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व केले, तर एका सत्रात त्याने पुण्याचे कर्णधारपद भूषवले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नईवर दोन वर्षांची बंदी लागली. त्यानंतर धोनी मागच्या वर्षी पुण्याचा कर्णधार बनला.
 
आयपीएलमध्ये धोनीचे प्रदर्शन 
सर्वाधिक सामने : १४३  
सर्वाधिक धावा : ३२७०  
सर्वाधिक विजय : ८३  
सर्वाधिक किताब : ०२ (२०१०, २०११). गंभीरच्या नावेही दोन किताब.  
सर्वाधिक फायनल : ०६  वेळा. (२००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५)
धोनीने २००८ ते २०१५ अशा अाठ सत्रात चेन्नईचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने दोन वेळेस २०१०, २०११ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने सहा वेळा  फायनल प्रवेश केला. 
 
१४३ सामन्यांत नेतृत्व
धोनी असा एकमेव खेळाडू आहे, ज्याने सर्व ९ आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सामने खेळले. आयपीएलमध्ये त्याने एकूण १४३ सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व केले. दुसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे. गंभीरने १०७ सामन्यांत नेतृत्व केले आहे. धोनीचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी किमान ३ सत्र कर्णधार म्हणून खेळावे लागेल. आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यत सर्व सामने कर्णधार म्हणूनच खेळले आहे.
 
पुढे काय : कर्णधारपदावरून दूर झाल्यानंतर आता धोनी पुण्याकडून आयपीएलमध्ये खेळताना आपल्या फलंदाजीवर अधिक फोकस करू शकतो. फलंदाज धोनीसाठी हा निर्णय तसा फायद्याचा ठरू शकतो.
 
- धोनीने कर्णधारपद सोडले नसून त्याला पदावरून दूर करण्यात आले आहे. मागच्या सत्रात आमची कामगिरी अत्यंत सुमार ठरली होती. आमच्या संघाचे नेतृत्व एखाद्या युवाने करावे, अशी आमची इच्छा आहे. एक नेता आणि व्यक्ती म्हणून धोनीबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. संघाच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाशी तो सहमत आहे.  
- संजीव गोयंका, मालक, पुणे फ्रँचायझी.  

IPL-10 मधील पुण्याचे सामने  
6 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v मुंबई इंडियन्स
8 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v किंग्स इलेव्हन पंजाब
11 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v दिल्ली डेअरडेव्हील्स
14 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v गुजरात लायन्स
16 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
22 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v सनरायझर्स हैदराबाद
24 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v मुंबई इंडियन्स
26 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v कोलकाता नाइट राइडर्स
29 एप्रिल : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
1 मे : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v गुजरात लायन्स
3 मे : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v कोलकाता नाइट राइडर्स
6 मे : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v सनरायझर्स हैदराबाद
12 मे : रायझिंग पुणे सुपरजायंट्स v दिल्ली डेअरडेव्हील्स
14 मे : राइजिंग पुणे सुपरजाइंट्स v किंग्स इलेव्हन पंजाब
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...