आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा तासांत तीन वेळा निवड समिती अध्यक्षाला भेटला अन् धोनीने सोडले कर्णधारपद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडून पुन्हा एकदा क्रिकेट जगताला धक्का दिला आहे. तो बुधवारी नागपुरात होता. नागपुरात त्याची टीम झारखंड आणि गुजरात यांच्यात रणजी सामना सुरू होता. झारखंडचा मेंटर बनून आलेला धोनी पूर्णवेळ स्टेडियमवर होता. खेळाडूंसोबत गप्पाटप्पा मारत होता आणि अचानक सायंकाळी त्याने राष्ट्रीय वनडे, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याचे वृत्त झळकले. जगभरातील क्रिकेटपटूंसह दिवसभर धोनी ज्या खेळाडूंसोबत होता, त्यांच्यासाठीसुद्धा ही धक्का देणारी बातमी ठरली. कर्णधारपद सोडले असले तरीही आपण इंग्लंडविरुद्ध वनडे, टी-२० मालिकेसाठी उपलब्ध आहोत, असे धोनीने स्पष्ट केले आहे.
   
चाहत्यांसाठी हा निर्णय अचानक अालेला असला तरीही धोनी स्वत:  कधीही कोणताही िनर्णय विचार केल्याशिवाय घेत नाही. नागपुरातही हेच घडले. बुधवारी त्याने सहा तासांत तीन वेळा टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांची भेट घेतली. सुरुवातीला सकाळी ११ वाजता, नंतर ४ आणि पुन्हा ५ वाजता भेटला. दोघांत काय चर्चा झाली, न धोनीने सांगितले न प्रसाद यांनी. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी ही माहिती िदली.   

यामुळे सोडले कर्णधारपद
- नव्या कर्णधाराला पुरेसा वेळ मिळावा म्हणून २०१९ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपआधी कर्णधारपद सोडले. कोहलीचे दमदार प्रदर्शन आणि आपल्या घसरत जाणाऱ्या प्रदर्शनामुळे दबावात होता. इंग्लंडविरुद्ध सुमार कामगिरी झाली असती तर दबाव वाढला असता.  
- धोनी-कोहलीची नेतृत्वाची शैली पूर्णत: भिन्न आहे. प्रदीर्घ काळ दोन वेगवेगळे कर्णधार असल्याने खेळाडूंच्या प्रदर्शनावर परिणाम होतो.  
- अश्विन, जडेजासारख्या अनेक खेळाडूंना धोनीने समर्थन दिले. मात्र, त्यांनी कोहलीला सर्व स्वरूपाचा कर्णधार बनण्यासाठी समर्थन दिले.

100 प्लस वनडे जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार
- २००७ मध्ये वनडे संघाचा कर्णधार बनला.   
- आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या तीन ट्रॉफी (वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्डकप) जिंकणारा पहिला कर्णधार.  
- टीम इंडियाला २००९ मध्ये कसोटी क्रमवारीत नंबर वन बनवले.   
- वनडेत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकणारा एकमेव कर्णधार. पाकिस्तानविरुद्ध डिसेंबर २०१२ मध्ये त्याने ही कामगिरी केली.  
- १०० पेक्षा अधिक वनडे जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार. एकूण तिसरा.   
- क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात २५० पेक्षा अधिक सामन्यांत नेतृत्व करणारा एकमेव खेळाडू.  (६० कसोटी, १८९ वनडे, ५१ टी-२०)  
- धोनीच्या नावे ६ कसोटी शतके, ८ वनडे शतके. टी-२० मध्ये शतक नाही.

यामुळे धोनी सर्वाधिक यशस्वी कर्णधार
१. २००७ : टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार, द. आफ्रिका  
२. २०११ : वनडे २०११ िवश्वचषक विजेता कर्णधार, मुंबई.  
३. २०१३ : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता कर्णधार, इंग्लंड. 

महेंेद्रसिंग धोनी देशभक्त आणि सच्चा खेळाडू आहे. त्याचे खेळाबद्दलचे समर्पण सर्वोत्तम राहिले आहे. धोनीच्या विचारातही नेहमी सुस्पष्टता असते. तो जे काही ठरवतो, ते खूप विचार करूनच करतो.  आपण सर्वांनी त्याच्या या महत्वाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.’  
- एम.एस.के.प्रसाद, निवड समितीचे प्रमुख.

धोनीने क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवले. कर्णधारपद सोडण्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्या नेतृत्वात मिळालेल्या शानदार यशाची आपण आठवण केली पाहिजे. देशासाठी त्याने दिलेल्या शानदार योगदानाबद्दल त्याचे अाभार मानले पाहिजेत. 
- सचिन तेंडुलकर  

2 वर्षापूर्वी सोडले होते कसोटीचे कर्णधारपद...
- डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधातील मालीकेत धोनीने कसोटीचे कर्णधारपद सोडले होते.
- धोनीच्या नेतृत्वात टिम इंडिया कसोटीत नंबर एक बनली.
- धोनीच्या नेतृत्वात भारताने 27 कसोटी सामने जिंकले आहेत.
- धोनीने 283 वन-डे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9 शतक आणि 61 अर्धशतक केले आहेत.
- वन-डेत धोनीचा सर्वोच्च स्कोर 183 रन आहे. हा स्कोर त्याने जयपूर येथे श्रीलंकेच्या विरोधात 2005 मध्ये बनवला होता.
- 2 एप्रिल 2011 मध्ये वल्र्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेच्याच विरोधात धोनीने 91 नॉटआउटची खेळी केली होती.

कपिल देव म्हणाला धोनीच्या निर्णयाला सॅल्यूट
- कपिल देव म्हणाला हा धोनीचा पॉझिटिव विचार आहे, देशाविषयीचा विचार आहे आणि नविन पिढीला संधी देण्याचा विचार आहे. त्याच्या या निर्णयाला सॅल्यूट करायला हवे.
- धोनीच्या या निर्णयात आपल्याला त्याच्या सोबत उभे राहिले पाहिजे.
- कसोटीचे कर्णधारपद सोडतांना देखिल त्याने हेच म्हटले होते, की नविन खेळाडू आले आहेत आणि त्यांना संधी द्यायला हवी,
- धोनीने हा निर्णय विचारपूर्वकच घेतला असेल असेही कपिल देव म्हाणाले.
 
प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या वतिने धोनीचे आभार- BCCI
- देशातील प्रेत्येक क्रिकेट प्रेमी आणि BCCI च्या वतिने मी धोनीचे आभार मानतो, असे BCCI चे सीईओ राहूल जोहरी यांनी म्हटले आहे.
- धोनीच्या नेतृत्वात भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे.
- धोनाच्या नेतृत्वात टिम इंडियाने नविन उंची गाठली, त्याच्या उपलब्धींना दशकांपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये लक्षात ठेवले जाईल.
- वन-डे आणि टी-20 चे कर्णधारपद सोडण्याच्या संदर्भात धोनीने BCCI ला सुचना दिली आहे, असेही जोहरी यांनी सांगितले आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...