आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धोनी इंडियन आर्मीकडून घेत आहे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍टार क्रिकेटर आणि मानद लेफ्टनंट कर्नल महेंद्र सिंह धोनी सध्‍या लष्‍करात पॅरा रेजीमेंटसोबत दोन आठवड्यांचे प्राथमिक प्रशिक्षण घेत आहे. आगरा येथील वायुसेनेच्‍या पॅरा ट्रेनिंग स्कूलमध्‍ये तो 15 दिवस राहणार आहे. अधिका-यांच्‍या मताानुसार सकाळी चार वाजता उठणे, मेसचे जेवण करणे, सायंकाळी सैन्यासोबत परेड करणे हा सध्‍या धाेनीचा दिनक्रम आहे. सेनेच्‍या एका अधिका-याने सांगितले की, धोनीने शुक्रवारी पीटीएस मैदानात प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षकाने त्‍याला वार्मअप, बंजी जंपिंगचे मानक, हवाई जहाज आदी विविध विषयांची माहिती दिली. मैदानातील प्रशिक्षणानंतर त्‍याला हवाई प्रशिक्षणही देण्‍यात येणार आहे. सोशल मिडीयावर सध्‍या त्‍याच्‍या या प्रशिक्षणाचे फोटो शेयर होत आहेत.

पुढील स्‍लार्इडवर क्‍लिक करून पाहा, धोनीचे प्रशिक्षणादरम्‍यानचे फोटो..