आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीने केले 1250 फुटांहून पॅराजंपिंग, एएन-32 एअरक्राफ्टमधून मारली उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- टीम इंडियाचा वन डे कर्णधार आणि लष्करात ऑनररी लेफ्टनंट कर्नल असलेल्या महेंद्रसिंह धोनीने बुधवारी सकाळी पॅराजंपिंग केले. त्याने एअरफोर्सच्या एएन-32 प्लेनमधून 1250 फुटांहून उडी मारली. त्याच्या फॅन्सना दूर ठेवण्यासाठी लष्कराच्या पोलिसांनी आधीपासूनच ड्रॉपिंग ग्राउंडला घेराव घातला होता. या आधी, धोनीने सोमवारी ग्राउंड टेस्ट पास केली होती.
पहिल्यांदाच झाला या पॅराशूटचा वापर
धोनीच्या आधी लष्कराच्या एका जवानाने उडी मारली. पण तो जवान ग्राउंडच्या बाहेर लँड झाला. या नंतर एअरक्राफ्टचे डायरेक्शन बदलण्यात आले. त्यानंतर धोनीने नवीन पॅराशूटच्या सहायाने उडी मारली. एअरफोर्सने या नवीन पॅराशूटच्या ट्रायल नंतरच धोनीला जंप घेण्याची परवानगी दिली. धोनी गेल्या चार दिवसांपासून येथे आहे. मात्र त्याचा हा नियोजित कार्यक्रम काही ना काही करणाने पुढे ढकलला जात होता. धोनीच्या आधी अनेक जवानांनी 1200 फूटांवरून उडी घेतली आहे. एएन-32 हे आर्मीचे कार्गो एअरक्राफ्ट आहे.
एनसीसी कॅडेट्सलादेखील भेटला धोनी
या आधी सोमवारी धोनीने एनसीसीच्या एअर विंग ऑफिसला भेट देऊन, तेथील कॅडेट्सशी गप्पाही मारल्या होत्या. धोनी स्वतःही एनसीसी कॅडेट होता. त्याने सी सर्टिफिकेटदेखील मिळवले आहे. 14 ऑगस्टला धोनी सेंट्रल स्कूलमध्येही गेला होता. येथे त्याने मुलांच्या काही प्रश्नांना उत्तरेही दिली होती. त्यांच्यासोबत ग्रुप फोटोही काढला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित फोटो...