Home »Sports »From The Field» Malinga Will Miss The World Cup

मलिंगा वर्ल्डकपला मुकणार; पाकविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर

वृत्तसंस्था | Oct 06, 2017, 03:00 AM IST

  • मलिंगा वर्ल्डकपला मुकणार; पाकविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर
काेलंबाे-सातत्याने अपयशी ठरत असलेल्या अनुभवी श्रीलंकन वेगवान गाेलंदाज लसिथ मलिंगाचा अागामी २०१९ मधील वर्ल्डकप खेळणे अनिश्चित मानले जात अाहे. कारण, याबाबतचे संकेतही श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले. त्याची पाकविरुद्ध हाेणाऱ्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका संघात स्थान मिळाले नाही. सततच्या सुमार कामगिरीमुळे त्याला या मालिकेसाठी संघातून वगळण्यात अाले. त्यामुळे त्याचा पुढच्या वर्ल्डकपमधील प्रवेशही संदिग्ध असल्याचे चित्र अाहे. त्याला भारताविरुद्ध मालिकेत समाधानकारक खेळी करता अाली नाही. याच सुमार कामगिरीमुळे त्याने स्वत:वर निवड समितीचा राेष अाेढवून घेतला. त्याने यंदा जूनमध्ये पुनरागमन केले. मात्र, त्याचा माेठ्या कामगिरीचा प्रयत्न फसला. त्याने दरम्यान झालेल्या १३ वनडेत १० विकेट घेतल्या.

१३ अाॅक्टाेबरपासून मालिका
दुबई येथे १३ अाॅक्टाेबरपासून श्रीलंका अाणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. या दाेन्ही संघांमध्ये पाच वनडे सामन्यांची मालिका रंगणार अाहे. त्यानंतर हे दाेन्ही संघ तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत समाेरासमाेर असतील.

Next Article

Recommended