आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल संकटात, आणखी एका महिलेचा आरोप- मला पाहून ख्रिसने टॉवेल पाडला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅनल 10 च्या रिपोर्टरसोबत बोलत असताना गेलने अभद्र कॉमेंट केली होती. - Divya Marathi
चॅनल 10 च्या रिपोर्टरसोबत बोलत असताना गेलने अभद्र कॉमेंट केली होती.
मेलबर्न - ख्रिस गेलवर आणखी एक महिला आणि पत्रकाराने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे गेलच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी गेलने लाइव्ह मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या टीव्ही रिपोर्टरसोबतच्या मुलाखतीत आक्षेपार्ह्य कॉमेंट केले होते. सर्वस्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर गेलने माफी मागितली होती.

दोन महिलांनी गेलवर काय-काय आरोप केले..
- वेस्ट इंडिज टीमसोबत काम करत असलेल्या महिलेने 'सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड'ला सांगितले, 'मी 2015 विश्वचषका दरम्यान वेस्ट इंडिज संघासोबत काम करत होते. एक दिवस सँडविच घेण्यासाठी मी ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. तिथे गेल एकटाच टॉवेल गुंडाळून होता. त्याने मला पाहिल्यानंतर जाणूनबुजून टॉवेल खाली सरकवला. त्याचे वर्तन पाहून मला धक्काच बसला आणि मी तत्काळ ड्रेसिंग रुम बाहेर पडले होते.'
- या महिलेने मेलबर्न रेनेगेड्सच्या मालकांकडे गेलवर कारवाईची मागणी केली आहे. गेल बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे.
- फॉक्स नेटवर्कच्या रिपोर्टर नेरोली मेडोज म्हणाल्या, 'गेल विक्षिप्त माणूस आहे. तो वारंवार ओंगळवाणे वर्तन करत राहातो.'
- मेडोज म्हणाल्या, 'एकदा मी त्याला प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याचे उत्तर होते - माफ करा मी तुमचा चेहरा पाहाण्यात गुंग झालो होतो, तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा विचारता का ?'
गेल रिपोर्टरला म्हणाला होता, तुझे डोळे फार सुंदर आहे, माझ्यासोबत ड्रिंक घेशील
- गेल जेव्हा शानदार खेळी करुन पॅव्हेलियनमध्ये पोहोचला तेव्हा चॅनल टेनची रिपोर्टर मेल मेकलॉघलिन त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आली.
- गेल म्हणाला, 'मी स्वतःहून तूला इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार होतो. त्यासाठीच मी आजची खेळी केली. मला फक्त तुझे डोळे पाहायचे होते. ते फार सुंदर आहेत.'
- 'आशा आहे की आज मॅच जिंकल्यानंतर तू माझ्यासोबत ड्रिंग घेण्यासाठी येशील. आता एवढीही लाजू नको बेबी.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पार्टी अॅनिमल ख्रिस गेलचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...