आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकवीर हरमनप्रीत काैरवर काैतुकाचा वर्षाव! माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागकडून अभिनंदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सहा वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाविरुद्ध झंझावाती द्विशतकी खेळी करून भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवेश निश्चित करणाऱ्या युवा फलंदाज हरमनप्रीत काैरवर काैतुकाचा वर्षाव हाेत अाहे. तिचे भारतीय संघाचा माजी स्फाेटक फलंदाज वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गजांनी खास काैतुक केले. हरमनप्रीत काैरने शुक्रवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य सामन्यात नाबाद १७१ धावांची खेळी केली. या धडाकेबाज दीड शतकाच्या बळावर भारतीय संघाने उपांत्य सामन्यात अाॅस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव केला अाणि अंतिम फेरी गाठली.  

अाम्ही वर्ल्डकप जिंकणार
उपांत्य फेरीच्या विजयाने  अात्मविश्वास द्विगुणित झाला. चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाला धूळ चारण्याचा अाम्ही पराक्रम गाजवला. अाता इंग्लंडचे अाव्हान सहज माेडून काढू. यासाठी अाम्ही उत्सुक अाहाेत,’ असे हरमनप्रीत म्हणाली. 

सेहवागकडून अभिनंदन
माजी स्फाेटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने  हरमनप्रीत काैरचे ट्विट करून  अभिनंदन केले. तिच्या अाक्रमक खेळीचे  खास काैतुक केले. तसेच तिला अागामी सामन्यासाठीही शुभेच्छा दिल्या.  

राजीव शुक्लांकडून चूक
अायपीएलचे माजी अायुक्त राजीव शुक्ला यांनी घाईगडबडीत हरमनप्रीतचे काैतुक करताना वर्ल्डकपएेवजी चॅम्पियन्स ट्राॅफीचा उल्लेख केला. दरम्यान, काही वेळानंतर त्यांना अापली चूक लक्षात अाली.   

काेहलीची अाक्रमकता
सेहवागसारखी फलंदाजीची हरमनची शैली अाहे. याशिवाय अाक्रमकता तिने  काेहलीकडून अात्मसात केली. त्यामुळे तिला वेगळा ठसा उमटवता अाला,’ असे तिची बहीण हेमजितने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...