आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2016 : पंजाबच्या किंग्जचा पराभव; केकेआर ६ गड्यांनी विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - गाैतम गंभीरच्या नेतृत्वाखाली काेलकाता नाइट रायडर्सने नवव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करताना तिसरा विजय मिळवला. काेलकाता टीमने मंगळवारी यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबवर ६ गड्यांनी मात केली. पंजाबच्या टीमचा लीगमधील हा तिसरा पराभव ठरला. तसेच काेलकाता टीमने चार सामन्यांत तिसरा विजय संपादन केला.

राॅबिन उथप्पा (५३), गाैतम गंभीर (३४), सूर्यकुमार यादव (नाबाद ११) अाणि युसूफ पठाण (नाबाद १२) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर काेलकात्याने १७.१ षटकांत शानदार विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ बाद १३८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता टीमने चार गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. उथप्पाने शानदार अर्धशतक ठाेकले. पंजाबच्या अक्षर पटेल व साहूने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.
तत्पूर्वी, पंजाबच्या सलामीवीर मुरली विजय व शॉन मार्शशिवाय एकाही फलंदाजाला केकेआरच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. विजयने सुरुवात चांगली केली. मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. विजयने २२ चेंडूंत २६ धावा काढल्या. यात ४ चौकार मारले. स्थानिक खेळाडू मनन वोहरा ८ धावा काढून चालता झाला. शॉन मार्शच्या बळावर किंग्जने सन्मानजनक स्कोअर उभा केला. मार्शने ४१ चेंडूंत ५६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने १ षटकार, ५ चौकार मारले.

पंजाबच्या फलंदाजांचे अपयश
विजय व मार्शशिवाय अॅबोटने १२ धावा काढल्या. मनन वोहरा (८), वृद्धिमान साहा (८), डेव्हिड मिलर (६), ग्लेन मॅक्सवेल (४), अक्षर पटेल (९), मोहित शर्मा (१), पी. साहू (१) यांनी हजेरी लावण्याचे काम केले.
मोहालीत कॅरेबियन मॅजिक दिसले
केकेआरकडून पुन्हा एकदा कॅरेबियन मॅजिक दिसले. केकेआरचा कॅरेबियन गोलंदाज सुनील नरेनने ४ षटकांत २२ धावा देत २ गडी बाद केले. पुनरागमनानंतर त्याची ही कामगिरी शानदार ठरली. आपण पूर्वीइतकेच घातक असल्याचे नरेनने सिद्ध केले. त्याने खतरनाक ग्लेन मॅक्सवेल आणि साहाला बाद केले. मिलरला युसूफने बाद केले. मोर्कलने २ गडी टिपले, तर उमेश यादवने १ विकेट घेतली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक