आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mashrafe Mortaza Suffers Minor Hand Injuries In Road Accident

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशाचा कर्णधार मुर्तझा जखमी, रिक्षातून स्टेडियमवर जाताना बसने दिली धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- मुश्रफे मुर्तझा... - Divya Marathi
फाईल फोटो- मुश्रफे मुर्तझा...
ढाका- बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार मुश्रफे मुर्तझा याला मीरपूरजवळ अपघात झाल्याने दुखापत झाली आहे. मुर्तझा गुरूवारी सकाळी सायकल रिक्षाने मीरपूरमधील स्टेडियमवर सरावासाठी जात असताना हा अपघात झाला. भारताविरोधात बांगलादेश या महिन्यात एक कसोटी व तीन एकदिवसीय सामने खेळणार असल्याने मुर्तझा दुखापतीने संघाला धक्का बसला आहे. तो कसोटीसाठी उपलब्ध नसेल मात्र एकदिवसीय मालिकेपर्यंत तंदुरूस्त होईल अशी बांगलादेशाला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 18 जूनपासून सुरवात होत आहे. मुर्तझा सायकल रिक्षातून मीरपूरमधील शेर बांगला स्टेडियममध्ये प्रशिक्षणासाठी जात असताना त्याच्या रिक्षाला बसने धडक दिली. यामध्या त्याच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. मुर्तझाची दुखापत गंभीर नसनू, तो भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल अशी आशा वर्तविण्यात येत आहे.
संघाचे प्रशिक्षक चंडिका हाथुरासिंघा नयांनी सांगितले की, मुश्रफे सायकिल रिक्षाने आपल्या घराकडून स्टेडियमकडे सरावासाठी येत असताना एक बसने धडक मारली. ही एक अत्यंत दुर्देवी घटना आहे. आम्ही मुर्तझाच्या दुखापतीमुळे चिंतित आहोत.
पुढे वाचा, मुर्तजाचे करियर रिकॉर्ड...