आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Match Preview For Ind Vs WI 3rd ODI At Antigua, Dhoni May Become 4th Highest Scorer For India

वेस्ट इंडीजसोबत आज तिसरा सामना, अझरचा विक्रम मोडण्याची धोनीला संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीने जर आजच्या सामन्यात 15 धावा केल्या तर तो भारताकडून सर्वाधिक वन डे धावा करणा-यांत चौथ्या क्रमांकावर येईल. - Divya Marathi
धोनीने जर आजच्या सामन्यात 15 धावा केल्या तर तो भारताकडून सर्वाधिक वन डे धावा करणा-यांत चौथ्या क्रमांकावर येईल.
अँटिगुवा- भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे शुक्रवारी येथील नॉर्थ साउंड मैदानावर खेळवला जाईल. मालिकेत सलग दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल. पहिला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. दुसऱ्या सामन्यात भारताने १०५ धावांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे वेस्ट इंडीजसाठी या मालिकेत विजय मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकात थेट प्रवेशासाठी त्यांच्याकडे बहुधा ही अखेरची संधी असेल. वेस्ट इंडीजने ही मालिका गमावली तर त्यांना पुढच्या विश्वचषकासाठी क्वालिफायरमध्ये खेळावे लागेल. यासाठी या लढतीत विजय मिळवण्यासाठी वेस्ट इंडीज संघावर दबाव असेल.
 
यावर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आयसीसी टीम रँकिंगमध्ये यजमान इंग्लंडशिवाय अव्वल सात संघांना विश्वचषकात थेट प्रवेश आहे. उर्वरित संघांना क्वालिफायर स्पर्धेत खेळावे लागेल. अशात वेस्ट इंडीजवर क्वालिफायर स्पर्धेत खेळण्याचे संकट वाढले आहे. त्यांना ही मालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. मात्र, त्यांचा मालिका विजय कठीणच दिसतो. 
 
वेस्ट इंडीजची स्थिती संकटमय-
 
- यजमान वेस्ट इंडीजसाठी सध्या संकटाची स्थिती दिसत आहे. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अपयशी ठरत आहे.
- मागच्या सामन्यात शाई होपने अर्धशतक ठोकले होते. मात्र, त्याच्याशिवाय एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही.
- गोलंदाजीतही विंडीजचे प्रदर्शन अत्यंत दुबळे ठरले आहे. भारतीय फलंदाजांना दबावात आणू शकेल, असे प्रदर्शन त्यांच्या एकाही गोलंदाजाला जमले नाही.
- जोसेफ आणि कर्णधार होल्डरवर गोलंदाजीची मदार असेल. 
 
युवा ऋषभ पंतला मिळू शकते संधी-
 
- दुसऱ्या सामन्यानंतर कर्णधार कोहलीने तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळू शकते, असे सांगितले होते.
- त्याला मधल्या फळीत युवराजसिंगच्या जागी किंवा केदार जाधवच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

धोनीला अझरूद्दीनचा विक्रम मोडण्याची संधी- 
 
- या मॅचमध्ये टीम इंडियाच्या काही खेळाडूंना विशेषकरून एम एस धोनी, युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यासमोर अनेक रिकॉर्ड्स मोडण्याची संधी असेल. 
- धोनीने जर आजच्या सामन्यात 15 धावा केल्या तर तो भारताकडून सर्वाधिक वन डे धावा करणा-यांत चौथ्या क्रमांकावर येईल.
- 293 वन डे खेळलेल्या धोनीने आतापर्यंत 9364 धावा केल्या आहेत, तसेच तो सध्या पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे मोहम्मद अझरुद्दीन आहे ज्याने वन डे करियरमध्ये 9378 धावा केल्या आहेत. 
- भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (18426 धावा) टॉपवर आहे. दुस-या नंबरवर सौरव गांगुली (11363 धावा) आहे, तर तिस-या नंबरवर राहुल द्रविड (10889 धावा) आहे. 
 
दोन्ही संघ असे-
 
भारत: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग, ऋषभ पंत, केदार जाधव, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक. 
 
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), देवेंद्र बिशू, रोस्टन चेस, मिग्युएल कमिन्स, शाई होप, अल्जारी जोसेफ, इविन लुईस, जेसन मोहंमद, अॅश्ले नर्स, केरेन पॉवेल, रोवमन पॉवेल, सुनील एम्ब्रिस, काईल होप. 
बातम्या आणखी आहेत...