आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजपासून वनडे मालिका: धर्मशालेच्या मैदानावर भारत-न्यूझीलंड सलामीचा सामना रंगणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मशाला - न्यूझीलंडविरुद्ध कसाेटी सिरीजमधील निर्भेळ यशाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला यजमान भारतीय संघ अाता वनडे मालिकाही अापल्या नावे करण्यासाठी उत्सुक अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेत अाहे. मालिकेतील सलामीचा सामना धर्मशालेच्या मैदानावर हाेईल. कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत नशीब अाजमावणार अाहे. विराट काेहलीच्या नेतृत्वात नुकतीच टीम इंडियाने न्यू्झीलंडविरुद्धची तीन कसाेटी सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. यासह भारताने कसाेटी क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठले. अाता धाेनीच्या नेतृत्वासह कामगिरीवर सर्वांची नजर असेल. ही मालिका जिंकून वनडेच्या क्रमवारीत प्रगती साधण्याचा यजमान भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
केन विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत दमदार पुनरागमन करण्याची अाशा अाहे. मात्र, यासाठी पाहुण्या टीमला माेठी कसरत करावी लागेल. कारण टीम इंडियाचे युवा गाेलंदाज हे अापल्या घरच्या मैदानावर सरस कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहेत. कसाेटी मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवल्यानंतर अाता वनडे मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा विलियम्सनचा मानस अाहे. त्यासाठी टीमचा अात्मविश्वास उंचावण्याची माेठी जबाबदारी त्याच्यावर अाहे.
टीम इंडियाचा ९०० वा सामना
यजमान भारतीय संघ रविवारी अापल्या वनडे करिअरमधील ९०० वा सामना खेळणार अाहे. अशा प्रकारे वनडेत हा अाकडा गाठणारा भारत जगातिल पहिला संघ ठरणार अाहे.
ट्रेंट बाेल्टचा भारताला धाेका
टीम इंडियाला अापल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा गाेलंदाज ट्रेंट बाेल्ट अधिक धाेकादायक ठरू शकताे. त्याच्याकडून न्यूझीलंड टीमला माेठी अाशा अाहे.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धाेनी (कर्णधार), विराट काेहली, अजिंक्य रहाणे, राेहित शर्मा, मनीष पांडे, जयंत यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, केदार जाधव, मनदीपसिंग, अमित मिश्रा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), काेरी अँडरसन, ट्रेंट बाेल्ट, डग ब्रेसवेल, मार्टिन गुप्तिल, डेविच, मॅट हेन्री, लाॅथम, जेम्स िनशाम, ल्यूक राेंची, मिंचेल सॅटनर, ईश साेढी, राॅस टेलर, बी. जे. वाल्टिंग, टीम साऊथी.
बातम्या आणखी आहेत...