आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ZIM vs IND: आज रंगणार T-20 चा सामना, या खेळाडूंवर असेल नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - वनडेतील यशानंतर भारत आणि जिम्‍बाब्‍वे आता T-20 सीरीज खेळण्‍यासाठी तयार आहे. या दाेन मॅचच्‍या सिरीजमधील पहिला सामना आज शुक्रवारी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचारच्‍या दरम्‍यान सुरू होणार आहे. वनडे सिरीज 3-0 ने जिंकल्‍यानंतर टीम इंडियामध्‍ये उत्‍साह पहायला मिळतो. त्‍यामुळे या सिरीजमध्‍येही उत्‍साह टिकून ठेवावा लागणार आहे.

टीमला जिंकण्‍याचा विश्‍वास
भारतीय संघाच्‍या काही खेळाडूंना झिम्‍बाब्‍वेसोबत खेळण्‍याचा अनुभव आहे. पण, त्‍यांच्‍या अनुपस्‍थितीत नवख्‍या खेळाडूंनी दमदार खेळीचे प्रदर्शन घडवले. त्‍यामुळे T-20 सिरीजवरही आपलेच नाव कोरले जाईल असा विश्‍वास टीम इंडियाला आहे.
या खेळाडूंवर नजर
मनीष पांडे, केदार जाधव यांची आधीच्‍या सामन्‍यातील प्रभावी कामगिरी लक्षात घेता त्‍यांच्‍यावर आजही विशेष नजर राहणार आहे. केदार जाधवने तीन मॅचमध्‍ये एकूण 126 धावा केल्‍या, तिस-या सामन्‍यात 105 धावांवर तो नॉटआऊट राहला. त्‍याच्‍या या लक्षणिय खेळीमुळे आणखी अपेक्षा वाढल्‍या आहेत. स्‍टुअर्ट बिन्‍नीनेही मागील मॅचमध्‍ये दमदार कामगिरी केली.
दोन्‍ही संघांमधील सहभाग

भारत - अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, संजू सॅमसन, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, केदार जाधव, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मनोज तिवारी आणि धवल कुलकर्णी.

झिम्‍बाब्‍वे - एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), सी.चिभाभा, चार्ल्स कॉन्वेंट्री, ग्रीम क्रिमर, क्रेग इरविन, नेविल मदजिवा, हेमिल्टन मसकद्झा, क्रिस मपोफू, टी.मुजरबानी, जॉन न्यूम्बू, सिकंदर रजा, डोनाल्ड तिरिपानो, पी.उत्सेया, ब्रेन विटोरी आणि मॅल्कम वालर.
पुढील स्‍लाईडवर पाहा, सामन्‍यासाठी सज्‍ज खेळाडूंचे फोटो..