आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा सराव सामना आज मुंबईत रंगणार, रहाणेकडे नेतृत्व; रैना, ऋषभ पंतच्या कामगिरीवर लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - वनडे मालिकेआधी भारत अ आणि इंग्लंड संघात मुंबईत गुरुवारी दुसरा आणि अखेरचा ५० षटकांचा सराव सामना होईल. दोन्ही संघ आपली तयारी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानावर खेळतील. या सामन्यात वरिष्ठ खेळाडूंसह काही युवांच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल.   

पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाला पराभूत केले होते. भारताकडून या सामन्यात धोनी, शिखर धवन आणि युवराज यांनी अर्धशतके ठोकली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे, तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला येत्या १५ जानेवारीपासून पुणे येथे सुरुवात होत आहे. दुसऱ्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेकडे भारत अ संघाचे नेतृत्व असेल. याशिवाय अनुभवी सुरेश रैना आणि युवा ऋषभ पंत आणि ईशान किशन यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.  
 
दोन्ही संघ असे 
भारत अ संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुरेश रैना, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, ईशान किशन, शेल्डन जॅक्सन, विजय शंकर, शाहबाज नदीम, परवेज रसूल, विनयकुमार, प्रदीप संगवान, अशोक डिंडा.  
इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्ट्रो, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डॉसन, अॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो. रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, क्रिस वोग्स.