आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • May Be Separate Coach To Test And One Day Match For The Indian Team

कसोटी, वनडे टीमसाठी स्वतंत्र प्रशिक्षक, मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारतीय क्रिकेट टीमला लवकरच आता स्वतंत्र असे दोन प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कसोटी आणि वनडे टीमचा समावेश असेल, असे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत. त्यामुळे मागील वर्षभरापासून प्रशिक्षकांविना वनवासात असलेल्या टीमसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल.
याची लवकरच घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेही क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची योजना सध्यातरी नवीन नाही. मात्र, बीसीसीआय आपल्या टीम इंडियासाठी नव्याने हा प्रयोग साकारण्याची शक्यता आहे. यातून भारतीय संघाच्या कामगिरीचा दर्जा उंचावेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
‘महेंद्रसिंग धोनीने आतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेच विराट कोहलीकडे टीमचे नेतृत्व सोपवण्यात आले. आता आम्ही स्वतंत्र कर्णधारच नव्हे, तर प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा विचार करत आहोत. टीमला योग्य वेळी कोणत्या प्रकारच्या सुविधेची गरज आहे, त्यावरच हा निर्णय अधिक प्रभावी ठरेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यातून टीमला फायदा झाल्याचे दिसल्यास वेगवेगळ्या कर्णधारांसह प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात काय गैर आहे?’ असेही या वेळी ते म्हणाले. त्यामुळे ता संघासाठी लवकर प्रत्येक फॉर्मेटसाठी स्वतंत्र्य प्रशिक्षक नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. आफ्रिकेविरुद्ध मालिकेच्या पुर्वी हा निर्णय होईल,असे चित्र आहे.
धोनी, हरभजनसिंग माझे आदर्श : गुरकिरत
‘टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरभजनसिंग हे माझे आदर्श खेळाडू आहेत. ज्या स्थानावरून धोनी फलंदाजी करतो त्याच क्रमांकावरून फलंदाजी करण्याची मला संधी मिळते. त्यामुळेच धोनी माझा रोल मॉडेल आहे,’ अशी प्रतिक्रिया टीम इंडियामध्ये प्रथमच निवड झालेल्या गुरकिरतसिंगने दिली. गोलंदाजीत ऑफस्पिनर हरभजनसिंगसोबत सुदैवाने मला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली, असेही तो म्हणाला.